ध्यान धारणा ही ,शांतता मनाची
आरोग्य धनाची, गुरुकिल्ली ||
सात्विक आहार, कंद मुळा भाजी
खावी रोज ताजी, सर्वकाळ ||
ॠषीतुल्य झाड, पिंपळ उंबर
वड हो अंबर, महाराजा ||
वृक्ष करीतसे, धरती श्रृंगार
ही हिरवीगार, दिसतसे ||
पहाटे उठणे, करा रोज योग
सरतील भोग, शरीराचे ||
शुद्ध हवा पोटी, रोग हे सरेल
आनंद भरेल, गगणात ||
राखा तुम्ही वन,आरोग्याची खाण
असु द्या ही जाण, वेळोवेळी ||
स्वच्छता राखा, लावा विल्हेवाट
कच-याचा थाट,निर्माल्यात ||
गर्दी ही लोकाची, झाली दाटीवाटी
खायला ही थाटी, मिळेनासी ||
अन्नधान्य वाढ,वापर खताचा
हिशोब शेताचा, बघतसे ||
रोग आमंत्रण, खाण्यातुन होते
जपा तुम्ही शेते, रात्रंदिन ||
झाडाचे महत्व, जाणा तुम्ही सर्व
लागवड पर्व, कार्यारंभ ||
पर्यावरणाचा, समतोल राखा
उभा पाठीराखा, वृक्षराजा ||
आता पाळा तुम्ही, गतिविधी पर्व
संगोपण सर्व, करितसे ||
नद्याचे पावित्र्य, राखा सर्व जन
करु नका घाण, निर्माल्याचे ||
नदीतले दिवे, अज्ञानाची पुडी
उजेडाचा गुढी, गावामधी ||
देव धर्म कर्म, करुन बाजार
सर्वच बेजार, करुनका ||
जडी बुटी धन ,आरोग्याचा ठेवा
मिळतसे मेवा, वनातुन ||
दुर्गा देशमुख, परभणी
दि 29/3/2023
Leave a Reply