नवीन लेखन...

गुढी नी पावसाची उडी

त्यावेळी आमचे कुटुंब रानात राहायला होते माझे बरेच दिवस रानामध्ये निसर्गाच्या सानिध्यात गेले. गावातील हवेपेक्षा रानातील हवा माझ्या मनाला अल्लाद देत होती. मनमोकळेपणाने राणा मध्ये फिरणे म्हणजे आनंदाला एक प्रकारचे उदाण येतेऐन उन्हाळ्यात राणा मध्ये अधून मधून असणारे वारे. आणि वाऱ्याबरोबर जमिनीवरची धूळ व पालापाचोळा आकाशात उंच असा उडत असे. हे पाहताना मला तर फार मजा वाटायची परंतु आजी मला सारखी हाक मारायची. बाहेर जास्त जाऊ नको वारे सुटले आहे परंतु मी आजीचे न ऐकता बाहेर नेहमी परीक्षण करत असे. तर आजी काहीवेळा म्हणायची या वादळात भूत असते यामुळे मीसुद्धा मनामधी गोंधळून जात असे. प्रत्यक्षात मी कधी भूत पाहिले नाही परंतु भूत आजीला दिसते की काय अशी शंका माझ्या मनाला वाटत होती. शंका वाटणे साहजिक आहे भुताखेताच्या गोष्टी फक्त ऐकल्या आहेत पण प्रत्यक्ष भूत पाहण्याचा योग आला नाही. मला वाटते आजीला भूत दिसते तिने नवनाथ ग्रंथ वाचला आहे की काय कारण मच्छिंद्रनाथ हिगळाई देवीचे दर्शन घेऊन एका रात्री त्यांनी. एका शाळेमध्ये मुक्काम केला होता मध्यान रात्रीला त्यांना भुते येत आहेत असे दिसू लागले. मच्छिंद्रनाथांनी हातामध्ये विभूती घेऊन भूत येत आहे त्या दिशेनेफुंकली ती भुते जागेवर स्थिर करून टाकली. असे मी नवनाथ ग्रंथामधुन ऐकले आहे. अशी विद्या आजीला प्राप्त झाली की काय मग आजीला भुते कशी दिसतात…..।

… अशा अनेक शंका माझ्या मनात येत होत्या चैत्र महिना आला होता. चैत्र महिना म्हणजे मराठी महिन्यातील नवीन सुरुवात म्हणून पारंपारिक सणामध्ये गुढीपाडव्याला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे.
….. चैत्राच्या पहिल्या दिवशी आनंदाने प्रत्येकाच्या घरी गुढी उभारून पूजा करतात. गुढीच्या काठीच्या एका टोकाला पातळ लिंबाच्या डहाळ्या व साखरेची माळ बांधून त्यावर पितळेचा तांब्या ठेवतात. गुढी च्या खाली रांगोळी काढून नारळ फोडतात अशी ही गुढी उभा करण्याची पद्धत आहे. या चैत्र महिन्यामध्ये फार ऊन असते शेतकऱ्यांच्या जमिनी नांगरून उन खात पडलेल्या असतात. बोडक्या शेतामध्ये काही झाडे यांना फुटलेली पालवी. व वसंत ऋतुचे आगमन हा एक आनंदाला बहार आलेला असतो. या दिवशी लिंब गुळ खाण्याची पद्धत आहे व प्रत्येकाच्या घरी या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. गुढीच्या पाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते हा आनंदच वेगळा असतो. या महिन्यांमध्ये वसंत ऋतूचे आगमन झाल्यामुळे पशुपक्षी आनंदाने गीत म्हणू लागतात. उन्हामुळे निसर्ग आकाश दिसत असला तरी हिरवीगार झाडे पशु पक्षांचे आवाज यामुळे बहरून गेलेला निसर्ग. हा आनंद काही वेगळाच असतो याच महिन्यापासून ग्रामीण भागामध्ये गावोगावी दैवतांच्या यात्रा भरत असतात. उन्हाळा कडक असला तरी गावोगावी यात्रा या भारत च आत्ताच असा हा गुढीपाडवा होय….।

.. या ऋतूमध्ये उन्हाळी पाऊस सुद्धा पडतो आजी म्हणते. गुढीपाडव्याला पाऊस येतो आणि त्या दिवशी तसेच घडले. आकाशात कुठे सुद्धा दिसत नव्हता परंतु सायंकाळी चार वाजता सूर्य ढगाआड लपला. आणि आकाशात एकाएकी काळे ढग दिसू लागले. माझ्या मनात वाटत होते. आजीला हे सारे कसे माहित आजी बरोबर सांगते आणि म्हणते कशी गुढी नी पावसाची उडी. काही वेळातच पाऊस पडायला सुरुवात झाली पाऊस आलेला पाहून मि सरळ आमच्या सपरा मध्ये घुसलो. पावसाचेथेंब जमिनीवर पडत होते हा पाऊस आल्यामुळे एका क्षणात बदलून गेला. सूर्य या पावसामुळे कुठे गडप झाला हे समजले नाही पृथ्वीवर एक सारखा अंधार पसरला होता. जवळ जवळ तीन तास पाऊस पडत होता या पावसाच्या आगमनाने जणू सर्वांनाच आनंद झाला होता. उभारलेली गुढी पाहून पावसाने उडी मारली असावी असे सुद्धा माझ्या मनाला वाटत होते. निसर्गाची लहर काही सांगता येत नाही हेच खरे माणसाप्रमाणेच निसर्ग सुद्धा लहरी निर्माण करतो हे सुद्धा जाणवत. घरी पुरणपोळी बाहेर पाऊस झाडावर बसलेला कोकिळा आणि त्याची गाणे. जणू निसर्गाला आव्हान करत होते आणि म्हणत होते आज आम्हाला माणसाप्रमाणेच आनंद झाला आहे. पावसाच्या सरी आमच्या छपराच्या पत्र्यावर जोराने पडत होत्या आणि घरात सर्वांना आनंद झाला होता. अशी ही गुढी व पावसाची उडी होय..।
…… पूर्णविराम…..।

-दत्तात्रय मानुगडे उर्फ नाना..।

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 30 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..