अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील प्रवरा नदीच्या काठावर महामयी मातेचं देवस्थान वसलेलं आहे; या देवीच्या स्थापनेचा इतिहासात डोकावल्यास असं आढळलं की मोगलांच्या काळात या परिसरात अनेक वेळा आक्रमण होत, त्यामुळे इथल्या पुजार्यांनी देवीची मूर्ती प्रवरा नदीच्या वाळूत गाडून टाकली, आणि पुढे, मूर्ती शिवाय उरलेलं देऊळ औरंगजेबाने उध्वस्त केले व या ठिकाणी मशीद बांधली; त्यानंतर म्हणजे पेशवाईच्या साम्राज्यात चंद्रचुडांनी दृष्टांताप्रमाणे नदीतून देवीची मूर्ती बाहेर काढली व तिची स्थापना करण्यात आली, ही मूर्ती अर्धनारी नटेश्वराची असून तीला स्त्री-पुरुषाच्या अलंकाराने सजवतात, महामयी देवीची मूर्ती उंच सिंहासनावर आरुढ आहे, तसंच देवीच्या मुकुटाखाली म्हणजे कपाळावर एका बाजूला चंदन तर दुसर्या बाजूला कुंकू लावण्याची प्रथा आहे. काहीजण असं मानतात की देवीची मूर्ती मोहिनीराजाची आहे; ज्ञानेश्वरीच्या भावार्थ दिपिकेत महालया असं या देवीचे वर्णन करण्यात आलं आहे. माघ मासात येथे मोठी जत्रा भरते, पाच दिवस चालणार्या या यात्रेत, भोजनाचा प्रसाद म्हणून भंडारा होत असतो.
— सागर मालाडकर
Leave a Reply