कोल्हापूर शहराच्या पूर्वेला एका टेकडीवर “टेंबलाई देवीचं” मंदिर असून तेमलाई ही महालक्ष्मी देवीची दासी होय, राक्षसांच्या वधासाठी तेमलाई मातेनं महालक्ष्मी बरोबर युद्धात भाग घेऊन असूरांचा नाश केल्याची कथा प्रचलित आहे. “महालक्ष्मी” व “तेमलाई” या जिवाभावाच्या मैत्रिणी, म्हणूनच महालक्ष्मी वर्षातून एकदा, नवरात्राच्या पंचमी या दिवशी तेमलाईची भेट घेण्यासाठी येत असते तेमलाई देवीची मूर्ती साधी तसंच पाषाणरुपी आहे. तेमलाई मातेचं मंदिर व सभोवतालचा परिसर निसर्गरम्य आहे, महालक्ष्मी अंबाबाई इतकीच “तेलमाई माते” वर भक्तांची श्रद्धा रुजलेली दिसते.
— सागर मालाडकर
Leave a Reply