एका सूनबाईने सासूबाईंना. पगार वाढ झाली आहे म्हणून फोन करून सांगितले. आणि सासूबाईंनी अभिनंदन केले. पण ईथेच संपले नाही खरा भाग वेगळाच कारण सून बाईंनी याच श्रेय सासूबाईंना दिले नातवाला सांभाळले होतेम्हणून ती नोकरी करु शकली व बढती मिळाली यावर काही तरी सांगायच आहे मला. आज बहुतेक सगळ्या मुली सुना नोकरी करतात. आणि नातवंड घरी आल्यावर फार वेगळीच परिस्थिती निर्माण होते. बाळ लहान असल्याने खरी जबाबदारी आज्जी वर पडते. एवढासा जीव दिवसभर सांभाळणे सोपे नाही. आणि नाही म्हटलं तरी आपल्या मुलांना आणि नातवंडांना सांभाळणे यात खूपच फरक असतो. त्याचे सगळे करणे यात मनावर दडपण येत. मला सांगायच एवढेच आहे की आपल्या मुलाला सासूबाईंनी सांभाळले होते म्हणून सून बाई प्रगती करु शकल्या असे प्रामाणिकपणे कबूल केले आहे. माझे डोळे भरून आले होते. किती छान वाटले वाचून मला. आणि सासूबाईंचा सगळा शीण गेला असेलच…
यावरुन मला माझे आठवलं. वयाच्या 72+मी दोन बाळंतपण केली आहेत. आधी लेकीच नंतर सुनेचे. नोकरीत असल्याने माहेरी जाता आले नाही म्हणून ती मोकळी होईपर्यंत तिला सांभाळायचे नतंर दोन तीन महिन्यांत ती नोकरीला जायची. पण आधी व नंतरही बाळाला न्हाऊ माखू घालणे. दूध जेवण. आजारपण. आणि इतर बर्याच गोष्टी असतात ते सगळे केले. पहिला वाढदिवस साजरा झाला पण दुसर्या वेळी मी अर्धांगवायूने परावलंबी झाले म्हणून बाई ठेवावी लागली होती. आणि मी बसल्या जागी त्या बाईला बऱ्याच गोष्टी सांगायची. नातू आता सहावीत आहे पण मी त्याचे काहीच करु शकत याची खंत वाटते वाईट वाटते रडायला येत. आणि मी काय काय केलं कस केल हे सांगूनही उपयोग नाही….
आता सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की एक आज्जी म्हणून कर्तव्य आणि मायेच्या पोटी दमायला झाले तरी करतोच. आणि मुल मोठी झाली की जाणिव ठेवली गेली नाही तर मनावर घेतले जात नाही. पण सून बाई जर जाणिवेने वागत असेल तर मन प्रसन्न होते. सार्थक झाले असे वाटते. नाहीतर तुमचे कर्तव्य होते आणि मी संसारासाठीच नोकरी करते. एका जाणिवेने किती कमावले जाते नाही तर किती गमावले जाते हे मोजता येत नाही जाणिव ठेवणे ही भावना असली की… असो मला सूनबाईचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे वाटते. आणि सासूबाई आता तुम्ही नाही तर मीच जास्त सुखावले आहे. आणि सर्व सूनबाईंना हात जोडून सांगते की हा आदर्श समोर ठेवला तर माझ्या सारख्या अनेक सासूबाईंचे आशीर्वाद मिळतीलच. कारण एकेक दिवस कसा काढला जातो याचा विचार करून बघा….?
-सौ कुमुद ढवळेकर
Leave a Reply