नवीन लेखन...

ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ भाग 3

विद्यापीठांसाठी अर्थव्यवस्था

बौद्ध धर्मात तपस्वी आणि भक्त नियमांचे काटेकोर पालन करत.कोणालाही शिक्षा करण्याचा अधिकार त्यांना असे.गुरूना सोने चांदी व पैसा घेण्याचा अधिकार नसे.बुद्ध विहारसाठी त्यांचे हितचिंतक पैसा पुरवत. विहार  दान देणाऱ्याना प्रोत्साहित करत असत. काही जण  मठाला किराणा,तूप,दूध देत असत. दान देणाऱ्यात,राजा कुमारगुप्त १ ,बुदधगुप्त,बालादित्य ,हर्षवर्धन राजा पुरुवरमन याने विद्यापीठाला भरपूर  पैसे दिले. राजा पाला याने ५ गावे दिली. अश्या प्रकारे विद्यापीठाला कधीही पैश्यांची कमतरता भासली नाही.

विद्यार्थी आणि गुरु—नालंदा विद्यापीठात १५०० गुरु आणि वेगवेगळे अभ्यासक्रम करणारे  ८५०० विद्यार्थी रहात असत. दिवसाला १०० चर्चासत्र व वादविवाद होत  असत. एका गुरूच्या हाताखाली सात ते आठ विद्यार्थी असत. गुरु प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देत असत.

नालंदा विद्यापीठातील महत्वाचे शिक्षक

नागार्जून— यांनी बौद्ध धर्माचा विस्तार केला.आणि मध्यमिका नावाचे तत्वज्ञान विकसित केले.

आर्यदेव—यांचा जन्म चौथ्या शतकात झाला. राजा जंबूद्वीप यांच्या सूचनेनुसार ब्रम्हगाथ ग्रंथाचे निर्माण केले. त्याचे तिबेटी भाषेत भाषांतर झाले.

असंग—त्यानी योगचार्याचा सिद्धांत विकसित केला.

धर्मपाल—हे कांचीपुरम येथील अधिकार्याचे पुत्र होते. त्यानी बुद्ध धर्माची खूप सेवा केली. नालंदा मध्ये त्यानी मुख्य गुरु म्हणून काम पाहिले.

शांतीदेव—त्यांचा कार्यकाल सन ६९५ ते ७४३ होता.

नालंदा विद्यापीठाचे अध:पतन—नालंदा विद्यापीठाची  अकराव्या शतकापर्यन्त भरभराट होत  होती.जेव्हा विद्यापीठाची महानता विक्रमशीलने ग्रहण करण्यास सुरुवात केली, तेव्हा विद्यापीठाला राजसंरक्षणाचा वाटा मिळू लागला. बाराव्या शतकात बखतीयार खिलजीने आक्रमण केले त्यावेळी नालंदा विद्यापीठाचा दुर्दैवी अंत सुरू झाला. विद्यापीठाची गाथा सांगण्यासाठी एकही गुरु शिल्लक राहिला. नाही.विद्यापीठाचे वैभवशाली ग्रंथालयसुद्धा जळून भस्मसात झाले, आणि भारतातील  आपल्या वैभवांची साक्ष देणारे एक  विद्यापीठ काळाच्या विस्मृतीत अंत पावले.

— रवींद्र शरद वाळिंबे

 

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..