जीवनात नाहीच ,माझ्या जागा त्याला कोठेही
धावावे लागतेच मला उगाच त्याच्यासाठी…
नसत्या माझ्या गरजा, जर साऱ्याच निगडीत त्याच्याशी
तरी जगलो असतो, जीवनच मी राजेशाही…
विनाकारणच नसता, झाला माझा संघर्ष कोणाशी
बळी द्यावाच नसता, लागला मज प्रेमाचाही…
माझ जगणंच झालाय , आज ते तर निगडीत त्याच्याशी
त्याच्याच शिवाय जगण , घंटा ठरतेय धोक्याची…
त्याच्या मागे धावत, अखेर ही होणार जीवनाची
मागचे साधतीलच, मग की जवळीक त्याच्याशी…
कवी – निलेश बामणे
Leave a Reply