नवीन लेखन...

सुपर कॉम्प्युटर (महासंगणक)

विज्ञान क्षेत्रात अशी अनेक क्षेत्रे आहेत, ज्यात अतिशय जटिल अशी समीकरणे किंवा गणने अगदी कमी कालावधीत करावी लागतात, त्यासाठी सामान्य गतीचा संगणक पुरेसा पडत नाही, त्यामुळे अधिक प्रोसेसर्स एकत्र जोडून एक असा संगणक तयार केला जातो, की ज्याची गणनक्षमता अफाट असते, त्यालाच सुपर कॉम्प्युटर म्हणजे महासंगणक असे म्हटले जाते.

आजचा सुपर कॉम्प्युटर हा उद्याचा साधारण संगणक ठरतो म्हणजे सुपर कॉम्प्युटर एकदा ठरला म्हणजे तोच राहात नाही.

जगात सर्वाधिक महासंगणक हे अमेरिकेत आहेत. भारतानेही प्रगत देशांनी तंत्रज्ञान नाकारल्यानंतर परम महासंगणक तयार केला व त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.

१९२९ मध्ये द न्यूयॉर्क वर्ल्डने सुपर कॉम्प्युटर हा शब्द पहिल्यांदा आयबीएमच्या टॅब्युलेटर्ससाठी वापरला होता. त्यानंतर १९६०च्या सुमारास कंट्रोल डेटा कॉर्पोरेशनमध्ये काम करताना सेमूर क्रे यांनी पहिला महासंगणक तयार केला.

सुरुवातीला स्केलर व व्हेक्टर प्रोसेसर्सचा वापर केला जात असे. नंतर समांतर प्रक्रिया करणारे तंत्र विकसित झाले.

सुपर कॉम्प्युटर्समध्ये शेकडो प्रोसेसर्स म्हणजे संस्कारक समांतर जोडले जातात, त्यामुळे त्याचा गणनाचा वेग वाढतो. त्यामुळे एकाच वेळी अनेक सूचना तो पूर्ण अमलात आणू शकतो.

हवामान, अंतराळ संशोधन अशा अनेक क्षेत्रांत वेगाने गणनाची आवश्यकता असते. यात एक प्रोसेसर व एक मेमरी युनिट अशा जोड्या तयार केल्या जातात. नंतर त्या चक्राकार पद्धतीने जोडल्या जातात, त्याला मेश असे म्हणतात. झाडांच्या शाखांसारखी त्यांची रचना केलेली असते.

सुपर कॉम्प्युटर हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते, त्यात मात्र तथ्य नाही.

नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेत जटिल समीकरणे सोडवण्यासाठी महासंगणक आहेत. डीप ब्लू या महासंगणक तर बुद्धिबळही खेळू शकतो. लिनक्स किंवा युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर हे महासंगणक चालतात.

महासंगणक जेव्हा काम करतो तेव्हा मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते, त्यासाठी द्रव वायू वापरून तापमान कमी ठेवावे लागते.  महासंगणकाचा वेग हा फ्लॉप म्हणजे सेकंदाला किती फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स करतो यावर अवलंबून असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..