नवीन लेखन...

बुलेटप्रूफ जॅकेट

बुलेटप्रूफ जॅकेटची चर्चा मुंबई हल्ल्यानंतर प्रामुख्याने झाली होती. ती जॅकेट्स ही चांगल्या दर्जाची नव्हती, असेही त्यावेळी सांगण्यात आले. शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीला चिलखत परिधान करून गेले होते, यावरून अशा साधनाची आवश्यकता फार जुन्या काळापासून जाणवत होती हे उघड आहे.

त्याकाळात असे जॅकेट्स हे धातूच्या बारीक साखळ्यांचे बनवले जात असत. त्यानंतरच्या काळात जपानमध्ये रेशमाचे अनेक थर वापरून असे बुलेटप्रूफ जॅकेट तयार करण्यात आले. त्यापाठोपाठ कोरियातही कापसाच्या धाग्यांचे १८ ते २० थर वापरून त्याची निर्मिती करण्यात आली होती. आता जे आधुनिक तंत्रज्ञान बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये वापरण्यात येते त्याचा शोध अमेरिकेत लागला. बुलेटप्रूफ जॅकेटचे सॉफ्ट आणि हार्ड असे दोन प्रकार असतात.

बंदुकीची गोळी, चाकू, हातबॉम्ब यामुळे शरीरावरील अत्यंत कमी क्षेत्रफळाच्या भागात प्रचंड वेगाने आघात होत असल्याने मृत्यू ओढवतो. बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये सेरॅमिक प्लेट्स तसेच केवलार या अतिशय मजबूत धाग्यांचा वापर केला जातो. यात वापरले जाणारे सेरॅमिक हे अॅल्युमिना प्रकारचे असते त्यापासून सफायरची निर्मिती करून मग ते जॅकेटमध्ये वापरले जाते. पॉलिइथिलिनचा वापरही त्यात करता येतो. ते हलके असले तरी फार सुरक्षितता देत नाही. १९७० च्या सुमारास बॅलिस्टिक नायलॉनचा वापर करून फ्लॅक जॅकेट्स तयार करण्यात आली, त्यानंतर ड्यूपॉटने टायरमधील स्टीलचे पट्टे काढून टाकण्यासाठी केवलार बॅलिस्टिक फायबरचा शोध लावला पण ते बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये वापरता येईल असे लक्षात आले.

बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये केवलार धाग्यांचे जाळे प्लास्टिक फिल्मच्या थरांमध्ये विणलेले असते. केवलार धागे हे पोलादापेक्षाही मजबूत असतात त्यामुळे फुटबॉलमधील चेंडूच्या पेक्षा अधिक वेगाने आलेली बंदुकीची गोळी ते थोपवतात व तिची गतीज ऊर्जा शोषून घेतात. एकप्रकारे एक्स्पोलजनच्या विरोधातील इम्प्लोजन येथे घडून येते. व्हेक्ट्रान नावाचे धागे पोलादापेक्षा पाच ते दहा पट मजबूत असतात. कोळ्याचे जाळे फार मजबूत असते त्याच्या स्पायडर सिल्क पासून बनवलेले बायोस्टील हे पोलादापेक्षा वीस पटींनी मजबूत असते. त्यामुळे कोळ्याच्या जाळ्यातील रसायन बनवणारे जनुक संस्कारित बकरे तयार केले आहेत.

कोंबडीच्या पिसांचाही उपयोग करता येईल त्याबाबत संशोधन सुरू आहे. कार्बन नॅनोट्यूब्ज या सर्वात मजबूत असतात पण त्यांचा भाव एका ग्रॅमला ५०० डॉलर म्हणजे फार महाग आहे. इराक युद्धात वापरलेले इंटरसेप्टर जॅकेट हे सेरॅमिक प्लेट्स व केवलारचा वापर करून बनवलेले होते त्यात मान व मांडीचा सांधा यांचेही संरक्षण होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..