नवीन लेखन...

उद्वाहक (लिफ्ट, एलेव्हेटर)

अलीकडच्या काळात निवासी इमारती, रुग्णालये व इतरही अनेक महत्त्वाची कार्यालये असलेल्या इमारती या बहुमजली आहेत. त्यांचे जिने चढून हव्या त्या ठिकाणी पोहोचण्याने वृद्धच काय पण तरुण माणसांचीही दमछाक होते.

एक मात्र अ खरे की, जिने चढण्याने जास्तीत जास्त कॅलरीज खर्च होतात, पण तरीही हे श्रम वाचवणे अनेकदा अपरिहार्यही असते, त्यासाठी आपण लिफ्ट, एलेव्हेटर म्हणजे उदवाहक वापरत असतो. लिफ्टचे सर्वात प्रचलित डिझाईन म्हणजे पोलादाच्या दोरावर चालणारी कार होय. या दोराच्या मदतीने ती वर खाली जात असते.

त्याला केबल सिस्टीम असेही म्हणतात. यात एक तर कार म्हणजे मेटल बॉक्स, त्यांचा तोल राखण्यासाठी काउंटरवेटस, इलेक्ट्रीक मोटर, कप्पी (पुली), इलेक्ट्रॉनिक नियंत्रण यंत्रणा असे भाग असतात. न्यूयॉर्कमधील याँकर्स येथे वास्तव्यास असलेल्या एलिशा ग्रेव्हज ओटिस यांनी १८६१ मध्ये एलेव्हेटरचा शोध लावला.

त्याने या यंत्राचे वर्णन इम्प्रूव्हमेंट इन हॉइस्टिंग अॅपॉटस असे केले होते. हा शोध निश्चितच क्रांतिकारी होता. आता तर नासा पृथ्वीवरून भूस्थिर उपग्रहापर्यंत सामान नेण्यासाठी एलेव्हेटर तयार करीत आहे. एलेव्हेटरला फार ऊर्जा लागते, असे नाही. कारण जी ऊर्जा तुम्हाला गुरुत्याच्या विरोधात वर नेताना लागते त्याची भरपाई खाली येताना तुमच्या वजनामुळे थोड्या प्रमाणात होते. असे असले तरी यांत्रिक बाबीमुळे विद्युत ऊर्जेची काही प्रमाणात हानी होत असते.

आता तर काचेच्या कार असलेल्या लिफ्ट मिळतात. काही बड्या लोकांच्या घरांमध्ये अशा लिफ्ट आहेत की, ज्या आलेल्या पाहुण्याची ओळख पटवतात व मगच आत घेतात. कुठल्याही लिफ्टचे आयुष्य हे साधारण २० वर्षे असते तरी त्याची डागडुजी नेहमी करावी लागते. लिफ्टचे केबल शिवाय हायड्रॉलिक, माईन शाफ्ट असे प्रकार असतात. वाहने उचलणाऱ्या, बोट उचलणाऱ्या विमान उचलणाऱ्या व निवासी लिफ्ट असेही इतर प्रकार आहेत.

लिफ्ट ही सी-सॉ प्रमाणे काम करते. सी-सॉच्या दोन्ही बाजूंना सारखीच वजनदार मुले बसली तर काय होईल तसेच येथे घडते. दोर असलेल्या लिफ्ट या हायड्रालिकपेक्षा जास्त सुरक्षित मानल्या जातात. यात पोलादी दोरखंड असतात. त्यांची संख्या अधिक असते. सगळे दोर तुटले तरी लिफ्ट सुरक्षित राहावी यासाठी ब्रेकिंग सिस्टीम असते.

लिफ्टमध्ये चढताना शांतपणे चढा, प्रमाणापेक्षा जास्त व्यक्ती नकोत, आग विझवण्यासाठी लिफ्ट वापरू नये. लिफ्टमध्ये अडकल्यास बाहेरच्या सुरक्षा रक्षकाच्या ठिकाणचा फोन नंबर जवळ असावा, अडकलेले दार लगेच काहीतरी करून उघडण्याचा प्रयत्न करू नये, पायातील पादत्राणे उंच टाचांची असतील तरी अपघात होऊ शकतो. लिफ्टची दर सहा महिन्यांनी निगा व दुरुस्ती करावी, विमा उतरवलेला असावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..