केलेस प्रेम तू ही भलत्याच गं धिटाने
उरली उजाड वस्ती तू जिंकली कटाने
मी हा असा कफल्ल्क माझी उदास गाणी
विराण या जगाची झालीस पट्ट राणी
देऊ कसे तुला मी आणून चंद्र तारे
जखडून घेतले मी हे पाय या धरे वर
घेऊन स्वप्न पंखे आलीस तू अशी का
आधीच भंगलेली स्वप्ने इथे किती तर
सांगून टाकली मी माझी जुनी कहाणी
पण वाटले तुला मी करतो उगी बहाणी
झाले अनेक तरीही पाहिल्याचे वेगळेपण
वाटे युगास भारी प्रेमातले जुने क्षण
ते वेड नवे होते होते ते प्रेम पहिले
तूफान एक आले प्रेमाची ज्योत विझली
सांभाळ तू ही म्हणतो आताच सतर्क करतो
तू आणलीस ज्योत ओसाड या महाली
-विनायक आनिखिंडी,
पुणे
मो ९९२२९७०३१७
Leave a Reply