नवीन लेखन...

प्लम्बिंग सामानाची निवड व गळतीवर उपाय

घराघरातून पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचे पाइप, झडपा (व्हॉल्व्ह), कोपरे (बेंड्स), नळ इत्यादी सामानांचा वापर केला जातो. या सर्व सामग्रीचा वापर करून टाकी व पंपापासून ते घरातील नळापर्यंत पुरवठा व्यवस्था जोडणीला प्लमिंग (स्पेलिंग प्लंम्बिंग पण उच्चार प्लमिंग) म्हणतात. सर्व व्यवस्थेची उद्दिष्टे १) योग्य दाबाने व योग्य प्रमाणात सातत्याने घरात पाणीपुरवठा होत राहणे. २) वापरलेले सामान (पाइप, नळ, झडपा) पाणी व हवा यांच्या क्रियेने न गंजणारे असावे. ३) माती, वाळू वा खडे पाइप लाइनमध्ये शिरण्यास प्रतिबंध करणे. ४) सर्व व्यवस्थेत कोठेही गळती होणार नाही याची दक्षता घेणे व दीर्घ कळासाठी ती टिकाऊ असणे.

यासाठी योग्य सामानाची निवड व त्याचा वापर होणे आवश्यक आहे. १) पाइप पाइनमध्ये ए. बी. सी असे तीन प्रकारचे वर्ग असतात. त्यातील ए आणि बी प्रकार पाण्यासाठी वापरायचे नसतात. सी प्रकारचे सामान जाड असते आणि पाण्याचा दाब सहन करू शकते. पाइप आतून-बाहेरून लोखंडावार जस्ताचा मुलामा दिलेले (गॅल्व्हनाइज्ड) असतात. इलेक्ट्रोप्लेटेड पाइप वापरू नयेत. योग्य आट्यांची फिटिंग्जच वापरावीत. २) झडपा नेहमी चांगल्या कंपनीच्या व क्रोमियम प्लेटेड पितळी असाव्यात. म्हणजे त्या टिकतात व गंजत नाहीत. ३) घरातील नळही क्रोमियम प्लेटेड व पितळी असावेत. त्याचे वॉशर रबरी किंवा प्लॅस्टिकचे असावेत. ४) गरम पाण्याच्या पाइपभोवती ॲसबेस्टॉस पट्टीचे आवरण दिलेले असावे. ५) आट्यांच्या जोडणीत टॅफ्लॉन टेप गुंडाळावा म्हणजे जोडणी गळत नाही. ६) वॉश बेसिन किंवा सिंकला पाणीपुरवठा करणारे पाइप पीव्हीसीचे असावेत, कारण ते वाकवावे लागतात. तसेच ड्रेन पाइपही प्लॅस्टिकचाच असावा, गळती होत नाही ना हे पाहण्यासाठी जोडणी झाल्यावर नळ उघडून तपासून पाहावे. कोणतीही झडप एकदम बंद करू नये, म्हणजे दाब एकदम वाढत नाही. तसा दाब येऊ नये, म्हणून इमारतीवरील टाकीच्या तळावर १५ सेंमी. पासून ते टाकीवर ६० ते ९० सेंमी. उंचीचा व्हेंट ठेवावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..