नवीन लेखन...

आपलं रसायनशास्त्र

‘लोकसत्ता’मध्ये मराठी विज्ञान परिषदेतर्फे गेली अनेक वर्षे सदर चालवलं जातंय! विज्ञानाच्या अनेकविध अंगांविषयी सामान्य माणसाच्या मनात अनेक कुतूहलं निर्माण होत असतात. या सदरातून ही कुतूहलं शमवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्या निमित्ताने दैनंदिन जीवनातील अनेक वैज्ञानिक विषय हाताळले गेले आहेत.

या वर्षी असाच एक, प्रत्येक माणसाच्या अगदी दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारा किंबहुना माणसाचं सारं जीवनच व्यापून राहिलेला, वैज्ञानिक विषय घेऊन आम्ही आपल्या भेटीला येत आहोत.

या वर्षीच्या सदरातून आम्ही आपणा सर्वांना ‘रसायनांच्या’ दुनियेची सफर करवणार आहोत.

काही दिवसांपूर्वी मला रसायनशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक माननीय प्रा. एम एम शर्मा यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मी त्यांच्या कानावर आता आम्ही लोकसत्तेत ‘रसायनशास्त्रा’ चं सदर सुरू करणार आहोत असं घातलं मात्र, क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, ‘अरे वा! हा तर सर्व माणसांसाठी फारच महत्त्वाचा विषय आहे; तुम्हाला माहीत आहे ना?… जर रसायनं नसती तर आपण जिवंतच राहिलो नसतो…..

आणि पुढे बोलता बोलता त्यांनी रसायनांचं आपल्या जीवनातलं महत्त्व उलगडलं. आपण श्वास घेतो, तेव्हा जो ऑक्सिजन आपल्या पेशीपर्यंत पोहोचतो, त्याच्या मदतीने अन्नाचं ज्वलन होऊन ऊर्जा निर्माण होते, आणि हे काम करण्यासाठी आपल्या शरीरातलं एक संप्रेरक म्हणजेच एक रसायन मदत करतं; जर हे रसायन नसतं तर आपण घेतलेल्या श्वासाचा आपल्याला काडीमात्र उपयोग झाला नसता आणि आपण जगूच शकलो नसतो. काही शर्मासरांनी रसायनशास्त्राचा आवाका आणि महत्त्व माझ्यासमोर मांडलं आणि या वर्षी या सदराच्या निमित्ताने आपण एका प्रचंड आवाका असलेल्या विषयाला हात घालायला निघालोय याची मला आणि पर्यायाने आमच्या साऱ्या टीमलाच जाणीव झाली.

चला तर… आपण सारेचजण या विषयाची उत्तुंगता समजून घेऊया आणि आपल्या साऱ्यांच्याच मनात वरचेवर निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं समजावून घेऊया !

डॉ. मानसी राजाध्यक्ष
मराठी विज्ञान परिषद, मुंबई

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..