पंचवीस एक वर्षापूर्वी विजय एका सरकारी शाळेत तिसर्या इयत्तेत शिकत होता. त्यावेळ्चा प्रसंग आठवून विजयला आजही स्वतःवरच ह्सू येत. त्या शाळेपासून पंदरा मिनिटाच्या अंतरावर असणार्या झोपडपट्टीत विजय त्यावेळी रहात होता. पण झोपडपट्टीत रहात असतानाही त्यावेळी विजयच्या वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम होती. त्यामुळे विजय शाळेत जाताना इतर मुलांच्या तुलनेत जरा जास्तच रूबाबात जात असे त्याचा तो रूबाब आजही कमी झालेला नाही म्ह्णजे त्याने तो कधीच कमी होऊ दिला नाही. पहिली – दुसरीला तो ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेच्या मुख्याध्यापिकाच त्याच्या वडिलांच्या खास परिचयाच्या होत्या आणि त्याकाळी त्या शाळेची शिस्त फारच कडक होती. पण ती शाळेत जाण्यासाठी बसने प्रवास करावा लागत असे तो टाळण्यासाठी नाईलाजाने त्याने या नवीन शाळेत प्रवेश घेतला होता. विजयला वर्गात शांत आणि शिस्तीत राहण्याची जणू सवयच जडलेली होती. पण तो कितीही शांत दिसत असला तरी स्वभावता शांत अजिबातच नव्हता. या नवीन शाळेत बहूतेक मुल खोडकर होती. त्यामुळे त्या मुलांच्या तुलनेत विजय किंचित वेगळाच होता.
त्याच्याच वर्गात प्रतिभा नावाची एक जाड-जुड, गोरी-गोमटी, गोड आवाज असणारी पण चपळ आणि निडर मुलगी होती. ती या शाळेत जूनी आणि हुशार असल्यामुळे त्याच्या बाईंनी तिला वर्गप्रमुख केल होत. ती वर्गप्रमुख असल्यामुळे वर्गातील सर्वच मुल तिला घाबरून रहात त्याचा कदाचित तिला गर्व झालेला असावा. वर्गात तिच्या मित्रांचा एक घोळ्काही होता. ती त्या घोळ्क्याची प्रमुख होती. त्या शाळेत दुपारच्या जेवनाच्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर सर्व मुलं डबा धुण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी शाळेतील सार्वजनिक नळावर जात. पण विजय जात नसे तो त्याचा सवयीचा भाग होता. तो रोजच शाळेत येताना त्याच्या सोबत एक मोठी पाण्याची बाटली आणत असे. एक दिवस काय झाले प्रतिभा आणि तिच्या घोळक्याने दुपारच्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर शाळेतील सार्वजनिक नळावर न जाता विजयची पाण्याची बाटली त्याला न विचारताच हिसकावून घेतली आणि ती रिकामी करून त्याच्या समोर आदळली त्या गोष्टीचा विजयला भयंकर राग आला तो शाळेची शिस्त मोडू शकत नव्ह्ता आणि त्यांना शिक्षाही करू शकत नव्हता. त्यामुळे नाईलाजाने तो दप्तर काखेला लावून रडत – रडत सरळ त्याच्या घरीच निघून गेला. त्याला आचानक रडत घरी आलेल पाहून त्याच्या आईला आश्चर्य वाटल कारण शाळेतून मधल्या सुट्टीत घरी येण त्याला माहीतच नव्ह्त. आईने रडत शाळेतून मधल्या सुट्टीतच घरी येण्याच कारण विचारल असता त्याने झालेला सर्व प्रकार कथन केला.
विजयची आई स्वतः अशिक्षित असली तरी ती आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत प्रचंड आग्रही होती. विजयची आई विजयला पुन्हा शाळेत घेऊन गेली. त्यावेळी कांबळे आडनावाच्या शिक्षिक त्याच्या वर्ग शिक्षिका होत्या. त्यांच्या मुलाच नावही विजयच होत आणि तो ही विजयच्याच वयाचा होता. त्याचबरोबर विजय हुशारही होता त्यामुळे सहाजिकच त्या बाईच्या मनात त्याच्याबद्दल ओलावा होता. विजयच्या आईने तक्रार केल्याबरोबर बाईनी प्रतिभाला जागेवर उभ केल आणि विचारल तू याच्या बाटलीतील पाणी प्यायलीस ? प्रतिभाने मानेनेच होकार दिल्यावर बाईनी तिला हात पुढे करायला सांगून तिच्या नाजुक हातावर चार-पाच फटके मारले आणि पुन्हा अस न करण्याची समज दिली त्यानंतर त्या वर्गातील कोणीच कधीच विजयच्या वाटेला गेल नाही. पट्टीचा मार बसल्यामुळे यापूर्वी कधीही मार न खाल्लेल्या प्रतिभाला काही केल्या रडू आवरत नव्हत. तिला अखंड रडताना पाहून विजयचा राग शांत झाला पण राग शांत झाल्यानंतर तिला रडताना पाहून त्याच्यातला ह्ळवा माणूस अचानक जागा झाला आणि आपण तक्रार केल्यामुळे तिला इतका मार बसला आपण तक्रार केलीच नसती तर आपल्याला हे टाळ्ता आलं असत. असा विचार तो स्वतःशीच करू लागला. विजय लहानपणापासूनचा स्वभाव होता. त्याने केलेली चूक जर त्याच्या लक्षात आली तर त्या चूकीबद्दल तो स्वतःच स्वतःला शिक्षा करून घेत असे. आजही त्याचा तो स्वभाव बदललेला नाही. प्रतिभाला एका मुलीला आपल्यामुळे त्रास झाला याची शिक्षा म्ह्णून विजयने शाळेत असे पर्यत वर्गातील एकाही मुलीशी कधीच मैत्री केली नाही. आजही जगाला त्याची शाळेतील फक्त एकच मैत्रिण माहीत आहे ती म्ह्णजे प्रतिभा…
— निलेश बामणे
Leave a Reply