भाद्रपद शुद्ध पंचमीचे दिवशी स्त्रियांनी करावयाचे व्रत. यात सप्तऋषिंची व अरुंधतीची पूजा करण्यास सांगितले आहे.
सप्तऋषि असे – १) कश्यप २) अत्रि ३) भारद्वाज ४) विश्वामित्र ५) गौतम ६) जमदग्नि ७) वसिष्ठ.
या उपवासाला स्त्रिया बैलाच्या श्रमाचे खात नाहीत. याचे कारण या व्रताच्या कहाणीत आहे.
अनेक स्त्रिया याचे उपोषण करतात, खरे पाहता उपोषण हे व्रताचे अंग आहे. त्यामुळे ऋषिपंचमीचे व्रत घेतले असेल तरच उपोषण करणे योग्य आहे.
Leave a Reply