नवीन लेखन...

पोटॅशियम

लहान मुले अथवा ज्येष्ठ नागरिक यांचे पाय का दुखतात. पोटॅशियम याला मराठीत पालाश म्हणतात. पोटॅशियम, सोडियम, जस्त, तांबे, मॅग्नेशियम, मॅगेनीज यांनी खनिज द्रव्ये असेही म्हणतात. ही खनिज द्रव्ये आपल्या स्नायू व हाडे यांच्यापासून मिळतात. सर्व खनिज द्रव्ये आपल्या सर्व अन्नातूनच मिळतात. जेवण झाल्यावर रूधिराभिसरण झाल्यानंतर ही सर्व खनिज द्रव्ये आपल्या रक्तात मिसळतात. पोटॅशियमचा मुख्य हेतू म्हणजे याची सर्व स्नायू बळकट होतात. तसेच आपल्या हाडातील यातून पोटॅशियचा हाडाचे थर बनविण्यात येतो. अशाच प्रकारचे जेव्हा आपल्या शरीरात पोटॅशियम कमी पडते त्याला ‘हायपोकॅलेमिया’ असे म्हणतात. त्याचप्रमाणे आपले पैलवान लोक आपले स्नायू अतिशय दणकट असल्याने हे स्नायू थोडे आकुंचन पावतात व त्यामुळे पोटॅशियमचा प्रभाव जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याला हायपर कॅलेमिया असेही म्हणतात. या हायपर कॅलेमियामुळे आपले स्नायू आकुंचन पावल्याने दुखावयास लागतात. तसेच पायातून बळही निघून जाते. तसेच यामुळे मूत्राशयाचा त्रास होऊन ते मूत्राशयाला त्रासदायक होऊ शकते. तसेच रक्तदाबही वाढू शकतो पण एक गोष्ट मात्र निश्चित. कितीही पोटॅशियम वाढले तरी ते आपल्या शरीराने सहज कमी जास्त होऊ शकते व ते शेवटी नॉर्मलला येऊन पोहोचते, हे अतिशय महत्त्वाचे असते.

लहान मुलांचे पाय का दुखतात? लहान मुले साधारण आठ ते दहा वर्षांची नेहमीच धावत पळत असतात. खेळणे हा लहान मुलांचा स्थायी भाव असतो व ते खेळतच असतात. शाळेत थोडा वेळ मिळाला तर परत खेळत असतात. मधल्या सुट्टीत डबा खाल्यावर परत मुले खेळत असतात. घरी आल्यावर आई काहीतरी खायला देते ते खावून परत खेळायला जातात. खेळून घरी आल्यावर आपला अभ्यास संपवून जेवतात व झोपी जातात भर मध्यरात्री एकदम आई पाय दुखतात म्हणून रडू लागतात. आई बिचारी मुलांचे पाय चेपते व मुले झोपल्यावर आई परत झोपायला जाते. मुलांचे पाय का दुखवतात याचे मुख्य कारण म्हणजे सतत खेळून व धावपळ करून आपला असलेला पोटॅशियम कमी कमी होत जाणे. त्यामुळे झोपताना मुलांचे पाय दुखतात. याला उपाय एकच की मुलांना चांगले खावयास देणे. आपल्या मागील बाजूस एक तक्ता दिला आहे.

तेथे पोटॅशियमचे प्रमाण दिले हेदेखील दिलेले आहे. हे सर्व तक्ते एकाच वेळी सर्व खाण्याची गरज नाही. उदाहरणार्थ जर केळे घेतले तर त्यात ४६७ ग्रॅम इतके पोटॅशियम असते. सर्व खनिज पदार्थात केळे सर्वश्रेष्ठ पोटॅशियम आहे. त्याचप्रमाणे ढोबळी मिरची, बेदाणे, बदाम, अक्रोड वगैरे लोक उपयोगीपणे व लहान गरीब लोकांसही ते परवडल्यासारखे असते. एक कपभर दूध व एक हिरव्या सालीचे केळे घेतल्यास हे पूरक अन्न असते. त्यामुळे कोणकोणते पदार्थ आपण घ्यावे, कोणाला काय आवडते तसेच ते किती खावे, हे ज्यांनी त्यांनी ठरवावे. जेवणात नेहमी कडधान्य वापरदेखील आपल्याला अवश्य करावा लागतो. त्यात मूग, चवळी, चणे, हरभरा यांचा समावेशही असतो.

आता प्रश्न येतो पैलवानाचा. बहुतेक तरुण मुले व मुली आपले स्नायू बळकट करावे असे वाटते. हे स्नायू जास्त बळकट केल्यास स्नायू आक्रसतात व ते फार दुखू लागतात. नुसते एकप्रकारचे स्नायू नाही तर अनेक प्रकारचे स्नायू दुखू लागतात. याला उपाय म्हणजे वेळोवेळी सतत पाणी पिणे व नंतर व्यवस्थित खाणे त्यामुळे हे स्नायू दुखण्यापासून कमी होणे, काय खावे, कसे खावे हेदेखील या तक्त्यामध्ये दिलेले आहे ते खाद्य आवडीप्रमाणे करावे.

ज्येष्ठ नागरिक लोक यांचे वय साधारण ६५ ते ७५ पर्यंत असते. या सर्व लोकांचे काही ना काही तरी तक्रारी असतातच. चक्कर येणे, पाय दुखणे, सांध्यातील हाडे दुखणे या प्रामुख्याने तक्रारी असतातच. त्यातील पाय दुखणे हे नेहमीचेच असते. ज्येष्ठ नागरिकांचे होते तेच लहान मुलांचे होते. ज्येष्ठ लोकांचे पाय दुखतात. हातातील स्नायू विशेषतः पोटऱ्या व हाडे, पाय दुखू लागतात. याचे कारण म्हणजे खनिजद्रव्ये कमी पडतात. स्नायू आकुंचन पावतात व दुखू लागतात. यावर उपाय एकच तो म्हणजे खनिज द्रव्याचे अन्न खाणे व भरपूर पाणी पिणे. असे केल्याने पाय दुखण्याचे प्रमाण खूपच कमी होते. या प्रमाणे वरील एक उपाय सुचवलेला आहे तो अतिशय महागही नाही. ते म्हणजे रोज सकाळी एक ग्लास दूध व एक हिरव्या सालीचे केळं खाणे तसेच १०० ग्रॅम बदाम अथवा १०० ग्रॅम अक्रोड यांची पूड करून ते एक चमचा दुधात मिसळावे, असे सतत आठ दिवसात घेतल्यास पायाचे दुखणे थांबते व पायात वळ येत नाहीत अथवा गोळाही येत नाही.

-श्री. मदन देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..