नवीन लेखन...

कोलेस्ट्रेरॉल

कोलेस्ट्रेरॉल एक भयावह प्रकार. पण भिण्याचे काहीच कारण नाही. कारण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोलेस्ट्रेरोल वयाच्या २० वर्षापर्यंत लहान मूल अथवा मुलीला कसलीच भीती नाही. मात्र पुरुषांच्या वयाच्या ३५ वर्षानंतर पुरुष अथवा स्त्री करीता वयाच्या ४५ वर्षानंतर जर छातीकरीता अपाय होत असेल, जसे छातीतील जळजळ होणे अथवा छातीत दुखणे वगैरे तक्रार असल्यास डॉक्टरला दाखवून लिपीड प्रोफाईल नावाची एक रोग्याची तपासणी अवश्य करून घ्यावी. यामध्ये कोलेस्ट्रेरॉलमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे लोडेंसीटी कोलेस्ट्रेरॉल याला एल.डी.एल. असे म्हणतात.

तसेच याला बॅड कोलेस्ट्रेरॉल असे म्हणतात. आता एलडीएल कोलेस्ट्रेरॉल यांची लिपीड प्रोफाईल टेस्ट केली असता खालील गोष्टी आढळतात.

एल. डी.एल कोलेस्ट्रेरॉल

१०० पेक्षा कमी असल्यास                                     अगदी उत्तम चांगले

१०० ते १२९                                                    ठीक

१३० ते १५९                                                    काळजी घेणे आवश्यक

१६० ते १८९                                                    अति काळजी घेणे

१९० चे जास्त                                                   त्वरित डॉक्टरला नेऊन दाखविणे.

 

आता दुसरा प्रकार हायडेंसीटी कोलेस्ट्रेरॉल. यात कोलेस्ट्रेरॉल जास्त असेल, डॉक्टरांना ताबडतोब दाखविणे अगत्याचे आहे.

एच. डी. एल. कोलेस्ट्रेरॉल

६० पेक्षा जास्त असल्यास                           जास्त असणे धोक्याचे

पुरुषांना ४० अथवा स्त्रियांना ५०                  धोक्याचेच असते.

आता दोन्ही प्रकारचे कोलेस्ट्रेरॉल असणे आवश्यक असते. त्यातील रक्त तपासणी खालील प्रमाणे.

टोटल कोलेस्ट्रेरॉल

२०० पेक्षा कमी                                          अति उत्तम

२०० ते २३९                                              धोक्याची सूचना

२४० पेक्षा जास्त                                          धोक्याची सूचना जास्त डॉक्टरला बोलावणे.

आता कोलेस्टेरॉल आपण जे लिपीड प्रोफाईल करतात यात एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार असतो. तो म्हणजे आहार नियंत्रणावर काहीच निर्बंध नसतात. बोकडाचे मांस खाणे याला रेड मिट असे म्हणतात. या रेडमिटमुळे अनेक अडचणी निर्माण होतात. तसेच आपण जे दुग्धजन्य पदार्थ खातो ते जसे लोणी, तूप, चीज वगैरे खाणे आणि शेवटी मद्यपान. अथवा अतिमद्यपान या मद्यपानामुळे साखर व अनेक स्निग्ध पदार्थ तयार होतात. यालाच ट्रायग्लीसराईड्स असे म्हणतात. हा एक फार धोक्याची सूचनाचा प्रकार असतो.

ट्रायग्लीसराईड

१५० पेक्षा कमी                                            काहीच प्रश्न नाही

१५० ते १९९                                                धोक्याची सूचना

२०० ते ४९९                                                गंभीर धोक्याची सूचना

५०० चे वर                                                  अतिगंभीर

आता प्रश्न येतो कोलेस्ट्रेरॉल कोठे मिळते. शरीरातील कोलेस्टेरॉल आपल्या रक्तात अगदी डोक्यापासून ते थेट पायापर्यंत रक्तात सर्वत्र मिळते. मुळात कोलेस्टेरॉल यकृत (लिव्हर) मध्ये असते व पित्त (बाईलसॉल्ट) येथे मिळते. जेव्हा मानवाला कोलेस्टेरॉल कमी पडत असेल तर ते शरीरात तक्रारीप्रमाणे रक्तात सोडता येते.

आता ज्येष्ठ नागरिक नेहमीच संतुलित आहार घेत असतो. यात आपण अन्न

खात असताना शरीराचे चांगले रुधिराभिसरण होते. अशा प्रकारे अन्नाचा रस तयार असताना आपल्या बारीक रक्ताच्या नसातून व मिसळत जातात. आता अशाप्रकारे बारीक कण झालेले अन्न स्वैरपणे सतत फिरत असते. असे फिरताना आपल्या रक्तातील नस असते व शरीरातील नस आपल्या भिंतीवर चिकट असतात. या भिंतीला इंटिमा असेही म्हणतात. या प्रकारे आपले रक्तातून फिरणारे सूक्ष्म कण यांना ग्यॉब्युल्स असेही म्हणतात. ही ग्याबुल्स फिरताना वर सांगितल्याप्रमाणे भिंतीवर चिकटतात. ही ग्योबुल्स सेरॉइड्स कॅल्शियम वेगळ्या प्रकारची असतात. असे करताना बरेच ग्यॉब्युल्स एकत्र होतात व याचा एक गोळा तयार होतो. हा गोळा आपल्या रक्ताच्या शरीरातील सुटून परत भरकटत असतो. आणि हा भरपूर असणारा ग्याबुल्स पुढे सरकतो व ह्रदयाचे

नकळत जवळ जाऊन पोहोचतो. बाकीच्या इतर नसा सरळ व्यवस्थित ह्रदयाच्या रक्त पुरवण्याचे काम करतात. पण हा गोळा मध्येच पटकन थांबतो व रुग्णाला अस्वस्थ वाटते. हा गोळा थोडा दाबाचा खाली लहानसा स्फोट होतो व ह्रदयाचे नुकसान होते.

यालाच स्ट्रोक अथवा हार्टअॅटॅक असे म्हणतात. हार्टअॅटॅकमुळे छातीत खूप दुखते व रोग्याला घाम फुटतो. डॉक्टर त्वरित बोलावण्याने सरळ हॉस्पिटलमध्ये भरती करतो.

मग मॉनिटर लावून इसीजी नर्स डोळे लक्ष ठेवून बघत असते. तसेच ऑक्सिजन गॅस वगैरे नळ्या लावतात व असंख्य औषधे चालू असतात. या आयसीयू क्षेत्रात सहसा परवानगी देत नाही. फक्त डॉक्टर आणि त्याच्या नर्सेस यांचा वावर चालू असतो. आता काही काळ गेल्यावर डॉक्टर थोडा वेळ उपाशीच ठेवावे लागते. नंतर अगदी डाळ, भातसारखे खाणे असते. हा हार्टअॅटॅक झाला असताना आपल्या शरीरातील तो एक गोळा दुसरीकडे फिरवून दुसरा हार्टअॅटॅक होण्याचा संभव असतो. रोगी हळूहळू बरा होऊ लागतो. मग थोडे चालणे, हलकेसे खाणे वगैरे गोष्टी बरा होऊ लागतो. अशा वेळी डॉक्टर निक्षून सांगतो की, धूम्रपान आजच सोडा तसेच मद्यपानही सोडणे अत्यंत गरजेचे असते कारण तसे नसेल तर परत हार्टअॅटॅक येऊ शकतो आणि म्हणूनच काळजी घेणे आवश्यक असते.

ही आपल्या कोलेस्ट्रेरॉलची गाथा आहे. आणि हे अत्यंत ढोबळपणाने लिहीत आहे. मी डॉक्टर नाही परंतु मी स्वतः बायोकेमिस्ट असल्याने आपल्या ज्येष्ठ नागरिकांना समजावून सांगण्याचे एक कर्तव्य म्हणून लिहीत आहे. आणि म्हणूनच हे प्रत्येक लहान ज्येष्ठ नागरिकाला समजावे, याच रितीने लिहिलेले आहे.

ह्रदयविकाराचा झटका आल्यावर रूग्णालयामधून रोगी अगदी सथं पावल्यानं परत घरी आणावे. मुद्याचा प्रश्न म्हणजे रोग्याला खावयास काय देणे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये राहाणारे डॉक्टर ख्रिचन बनार्ड यांना ५० प्रकारे ह्रदयरोग कसे साभांळावे नावाने एक पुस्तक लिहिले. (फिक्टी वेज टू हेल्दी हार्ट) हे पुस्तक खूप बोलके होते. डॉक्टर बनार्ड स्वतंत्र शाकाहारी होते. तसेच संपूर्ण र्निव्यसनी होते. ते सिगारेट अथवा दारू कधीच घेत नसत. एकदा डॉक्टर बनार्ड यांचा एक खासगी कामात आपल्या सायकलने घरी येत होते. घरात खूप गडबड चालली होती. पाहातात तर घरात दहा बारा माणसे सारखे सिगारेट अथवा चिरुट ओढत होते व सोबत मद्याचा एक प्यालाबरोबर घेतला होता. बनार्ड यांना खूप आश्चर्य वाटले. समोर एक सहा महिन्याचा तान्ह बाळ बसले होते. बनार्ड सगळ्यांना थांबिवले आणि प्रश्न विचारला की, मी सिगरेट अथवा चिरूट ओढले हे ठीक, पहा हा तान्हा बाळ किती सिगारेट ओढतो. सगळयानां काहीच समजेना. बनार्डने सांगितले तो केवळ सहा महिन्याचा आहे. तुम्ही सिगारेट ओढत असताना या तान्हा बाळांचे धूर त्याच्या घशातून थेट अगदी फुप्फुसातून आत जातो व फुप्फुसातून काळे डाग सतत पडत असतात. तसे तुमचेही फुप्फुसाचे काळे डाग पडत असतात. शेवटी ते वैतागून म्हणाले एक एक वेळ दारू पत्करली तर कृपा करून सिगारेट ओढू नका. ते लोक मघाशी म्हणाले की सिगारेटने घशाचा कर्करोग होतो. सगळ्यांची पोट फुगलेले व बनार्ड खूप वैतागले मग कशाला प्यायची दारू. मुले विस्की प्यायलाने यांची शेवटी साखर होते व मधुमेह कारणीभूत होतो. डॉक्टर बनार्ड सायकलने वरुन सरळ घरी गेले.

सांगण्याचा अर्थ एवढाच की, ह्रदयावर शस्त्रक्रिया झाल्यावर घरी आल्यावर कृपा करुन सिगारेट अथवा दारू पिऊ नये. एकदा आणखीन एक प्रसंग डॉ. बनार्ड यांनी सांगितले. एका रोग्याची आपल्या डॉक्टरने बायपास सर्जरी केली होती . रोगी साधारण एक महिन्याने सरळ घरी आणला. पण काही दिवसानी हा रोगी आपल्या बायकोबरोबर डॉ. बनार्डकडे गेला. डॉक्टला थोडे विचित्र वाटले. तू परत का आलास रोगी म्हणाला मी तसा बरा आहे. पण बायको सांगू लागली की डॉक्टर याला सारखी दारुची आठवण होते. रोगी म्हणाला दारू घेतली पाहिजे नाहीतर मी वेडा होईन. डॉक्टर बनार्ड म्हणाले. बर तू एक पेग घेत जा. परत रोगी म्हणाला, डॉक्टर ब्रिटिश पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल रोज सकाळी दोन पेग दारू, चिरुट ओढतात. यालाच काही नाही होत. डॉ. बनार्ड म्हणाले, ते पण सर विन्स्टन चर्चिल यांना रोज सकाळी एक डॉक्टरची गाडी येते. समोर एक मोठा बॉक्स असतो तीन चार डॉक्टर्स बरोबर असतात तसेच दोन नर्सेस बरोबर असतात. डॉक्टर त्याचा इसीजी काढतो. परत जुने पेपर तपासून पहातो. दुसऱ्या डॉ. बरोबर विचार करतो व परत काही तरी लिहितो. लगेच दोन नर्सेस अंगातून रक्त काढून घेतात व याची तपासणी करतात. डॉक्टर परत विचार करतात व घरी जातात. आता तुम्ही सांगा तुम्हाला परवेडल का? तेव्हा तुम्ही आपले कधीतरी एक पेग घ्या. डॉक्टर बनार्डने त्यांना समजावले व हा रोगी परत आला नाही.

ही झाली दारू व सिगारेटची गाथा खायचे काय याचा विचार करु. आता कोलेस्टेरॉल यांची समीकरण परत बदलावी लागतील कारण आपण जो आहार खाणार आहोत ते कोलेस्टेरॉलपासून सावध असणे महत्त्वाचे आहे.

अगदी पहिल्या प्रथम सिगारेट किंवा दारू यांच्यापासून माणसाने सावध राहावे.

कारण सिगारेटमुळे घशाचा कर्करोग त्वरित होऊ शकतो. तसेच दारू मग ती व्हिस्की असो अथवा बीअर असो दोन्ही जीवाला घातक असतातच.

दुसरी अत्यंत समाधानाची गोष्ट म्हणजे आपल्या जेवणात मिठाचा वापर फार कमी करावा.

आयुर्वेदाच्या म्हणण्याप्रमाणे हिरव्या भाजीपाला खाण्याने खूप फरक पडतो. तसेच अनेक प्रकाराची फळे अथवा फळाचा रस घेणेदेखील चांगले असते. मात्र फळाचा रस घेण्याऐवजी नुसतेच फळ खाणे योग्य कारण त्यामुळे फळातील फायबरचे प्रमाण चांगले वाढते व पोट साफ ठेवते. तसेच जेवणात ताकाला फार महत्त्व आहे. ताकाला अमृत असेच म्हणतात. कारण त्यात लॅक्टीक अॅसीड यांचा समावेश जास्त असतो. ताक दररोज दोन्ही वेळा प्यायल्याने खूप फायदा होतो. परंतु ताक एकदा बनविले ते काही तासांनी फेकून द्यावे कारण ताक शिळे झाल्यावर त्यात सूक्ष्मजंतू (बॅक्टेरिया) असतात व पोटाला वाईट असते.

आपण जेवताना खाद्य तेलाचा नेहमीच वापर केला जातो. त्यात गोडे तेल अथवा शेंगदाण्याचे तेल वापरू नये. नेहमी सूर्यफूल तेलाचा वापर करावा. सर्वात उत्तम म्हणजे ऑलिव्ह ऑईल हे अत्यंत फायदेशीर असते. वनस्पती तुपाचा वापर करु नये.

तसेच जेवणात मासे खाताना बांगडा खाऊ नये. कारण त्यात तेल खूप असते.

तसेच कोळंबी अथवा सुरमई सारखे मासे खाऊ नये. जेवताना हिरव्या पालेभाजी जसे पालक, मेथी, ढोबळी मिरची यांचे सूप अथवा टॉमेटो यांचा नियमित वापर करावा.

कोलेस्टेरॉल रुग्णांनी काय खावे?

जर माणसाला अथवा रुग्णाला कोलेस्टेरॉल वाढत असेल तर खाण्यासाठी आवश्यक उपयोग करावा. कोलेस्टेरॉल बदलामुळे नवीन प्रक्रिया सुरु होते. आणि म्हणून सवयी सांभाळल्याच पाहिजे.

१. कोलेस्टेरॉलचे खाणे बदलताच चरबीयुक्त पदार्थ अजिबात खाऊ नये.

२. सोडियम अथवा मिठाचा उपयोग शक्यतो कमी करावा. तसेच साखरेचे प्रमाण कमी करावे.

३. आपल्या तंतूमय पदार्थाचा जास्त वापर करावा. जसा हिरव्या पालेभाज्या फळे खाणे इष्ट. पण फळाचा रस जास्त घेऊ नये. कारण रसाऐवजी नुसते फळ खावे. त्यात चोथा असतो. याला फायबर असे म्हणतात. फायबर मुळे पोट अगदी साफ होते.

४. खाद्य तेलाचा वापर शक्यतो कमी करावा. परवडेत असेल तर ऑलिव्ह ऑईल याचा वापरणे इष्ट. मात्र वनस्पतीजन्य तेलात- हायड्रोजनेटेड ऑईल असे म्हणतो. सूर्यफूल अथवा करडईचे तेल चांगले.

 

चरबीयुक्त खाण्याचे प्रकार

लाल मटन (विशेषःत बोकडाचे) अथवा शेल फिश कोळंबी, खेकडा अथवा सुरमई, बांगडे मासे ताबडतोब वर्ज्य करावे. त्यात तेल जास्त असते. तसेच साईचे दूध टाळावे.

त्याने चरबीचे प्रमाण वाढते. तसेच लोणी, तूप, चक्का अथवा इतर डेअरी प्रॉडक्ट याचा उपयोग टाळावा. तसेच नारळाचे पाणी जीवाला घातक आहे तसेच बाजारातून मिळणारे पॅकेज फूड अथवा तळलेले पदार्थ तसेच फ्रेंच फ्राईड कधीही खाऊ नये. आपल्या शेवटी चार्ट दिलेले आहेत यांचा जरूर वापर करावा. ड्रायफ्फ्रुट अथवा सुकामेवा जरूर खावा. जसे बदाम, अक्रोड, काजू वगैरे याने जीवाला अजिबात धोका नाही. अंड्यातील पिवळा बलक फेकून द्यावा.

मात्र एक धोक्याची सूचना. कोणत्याही परिस्थितीत मद्यपान अजिबात करू नये.

त्याने पोट फार मोठे होते. हेही टाळणे शक्य आहे.

-श्री. मदन देशपांडे          

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..