लहान मुले म्हणजे साधारणपणे ८ ते १० वर्षे असताना कुठेही हिंडावे फिरतात. परत शाळेतील आपला अभ्यास संपवून खेळावयास जातात व सतत हुंदडत असतात. जेवण झाल्यावर सगळे काम अथवा जाग येताना आईचे काम करीत बाळ मोठ्याने ओरडत असते. आई माझे पाय वळत असतात, असे सांगून मोठ्याने ओरडत असते किंबहुना रडतसुद्धा असतो. आई बिचारी मुलांना जवळ ठेवून सतत पाय चेपत असते. बाळ झोपला की, मग आपले काम संपवण्याकरीता निघून जाते. हे जवळ जवळ रोजचेच होते. बाळाचे पाय का दुखतात. डॉक्टर संध्याकाळी घरी गेल्यावर डॉक्टर काही गोळ्या देतात. त्यामुळे बाळाला बरे वाटते. आता मुलांचे पाय का दुखतात?त्याला उपाय काय? त्याला उपाय नेहमी सापडतो. आपण जेव्हा मुले अथवा मुली नेहमी नकळतपणे व्यायाम करीत असतात. त्यामुळे बाळाचे पोटॅशियम हे आपल्या शरीरातील खनिज द्रव्ये कमी पडतात. तसेच कॅल्शियमही कमी पडतात. अशावेळी बालकाची पोटॅशियम घेणे अत्यंत आवश्यक असते. बाळाला सकाळी शाळा सुटण्याच्या अगोदर १ कप चांगले दूध व ५० ग्रॅम बदाम आणि ५० ग्रॅम अक्रोड यांची चांगली पूड करून एक चमचा दुधात घालून द्यावे तसेच १ हिरव्या सालीचे केळे पूर्णपणे द्यावे. तसेच रात्री झोपताना साधारण थोडेफार पपई खावयास द्यावी. असे नियमित रोज साधारण आठ ते दहा दिवसांनी केल्यास मुलाचे अथवा मुलीचे पाय दुखण्याचे थांबतात. तसेच शरीराची हाडाची वाढ ही लवकर होते व रक्त पुरवठाही चांगला होतो. संबंध दिवसात बाळाला साधारण ४ ते ६ ग्लास पाणी प्यावे.
जी गोष्ट लहान मुलांची तीच गोष्ट ज्येष्ठ नागरिकांनी. ज्येष्ठ नागरिकांची साधारण ६५ ते ७० वर्षापासून हाडाचे नेहमी विघटन होते व कालांतराने ते ठिसूळ होतात व फारच लवकर हाडे अनेक प्रकारे मोडले जातात. तसेच संध्याकाळी कुठे थोडे फिरावयास गेल्यावर झोपताना मध्यंतरी एकाएकी जाग येते व पाय अतिशय दुखू लागतात हा भाग साधारण पोटरीपर्यंत दुखू लागतात. त्यालाही उपाय एकच ते म्हणजे ५० ग्रॅम बदाम, ५० ग्रॅम अक्रोड मिक्सरमध्ये पूड करून ते एक चमचा प्रत्येकी देणे अत्यंत आवश्यक असते. त्याचप्रमाणे बरोबर एक हिरव्या सालीचे केळे हेही आवश्यक असते. मात्र शक्य असल्यास नियमितपणे द्यावे. पाय दुखणे खात्रीने बरे होतात. मात्र सकाळचे केळे फक्त सकाळीच द्यावे. रात्री जेवताना पपई, चिकू तसे तत्सम काही देणे आवश्यक असते. पपई रात्री केली तरी चालते. मात्र संबंध दिवसात प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी दररोज साधारण ८ ते १०ग्लास पाणी पिणे अत्यावश्यकच असावे.
ज्येष्ठ नागरिक स्त्री अथवा पुरुषांना चक्कर येणे
साधारणपणे ज्येष्ठ नागरिकांना आपल्या वयाच्या ६५ ते ७० वर त्या अधिक लोकांना चक्कर येण्याची नेहमीच सवय असते. अशा प्रकारची चक्कर येणे, ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट असते. अशा प्रकारची चक्कर का येते? या मागचे कारण काय? चक्कर या विषयाला व्हर्टिगो असेही म्हणतात. अथवा मेनियर सिंड्रोम असेही म्हणतात. खरे सांगावयाचे म्हणजे चक्कर येणे, हा एक स्वभाव धर्म असतो. साधारण १९व्या शतकात फ्रान्समधील डॉ. मेनियर यांनी शोध लावला. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, आपले दोन कान असतात या कानाला मोठा कान बहीर कर्ण, मधला कान म्हणजेच मध्य कर्ण व शेवटचा कान म्हणजे अंतकर्ण. ही तीनही कान आपल्या लहान मेंदूच्या दोन टोके असलेले अंतकर्णावर स्थिरावले असतात. या अंतःकर्ण एकमेकापासून थोडे दुरावलेले असतात व या नळीसारखा वाहणारा पदार्थ याला व्हेस्टीबूल असे म्हणतात. या व्हेस्टीबूलमध्ये एक द्रव्य भरलेला असतो व तो थोडा जरी कमी जास्त झाला तर चक्कर येते. परंतु आजतागायत याला अनेक मान्यवर शास्त्रज्ञांनी शोध लावण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. मध्यंतरी एक नामवंत होमिओपॅथिक डॉक्टर के.व्ही. मुजुमदार यांनी काही औषध सांगितले. डॉक्टर के.व्ही. मुजुमदार गोवा मेडिकल कॉलेजमध्ये एक मेडिसिनचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला चक्कर येत असेल तर कोनियम २०० या गोळ्या दिवसातून तीन वेळा घेतल्यास चक्कर येणे कमी होते. अथवा एक जेल्सीयम २०० हे देखील एक प्रभावी औषध असते. त्यानेही फायदा होऊ शकतो. मात्र हे औषधी वारंवार काही दिवस घेतले तरी चालते. तसेच हे औषध कोणत्याही व्यक्तीला चालू शकते. होमिओपॅथी औषधात विशेष म्हणजे त्यांनी कोणताही अपाय होत नाही अथवा दुसरा कोणताही त्रास होत नाही.
-श्री. मदन देशपांडे
Leave a Reply