सहवासाचे सुख जेवढे, वियोगाचे दुःखही तेवढे
बांधल्या प्रेम बंधन गाठीं, तुटता विसरुन जाती
लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा
उडून जातां शाल सुखाची, व्यक्त होई मग दुःखे जीवाची
कशास करितो प्रेम असे ते, सहवासाने वाढत जाते
फुग्यापरी ते जातां फूटूनी, आणिते दुःख सारे जीवनीं
दाखव प्रेम त्याच ठिकाणीं, बघणार नाही वियोग कुणी
केवळ प्रभूचा सहवास दिसे, वियोगरहीत तेच असे
प्रेम वाढते प्रभूसहवासे, निस्वार्थी भक्ती त्यांत वसे
समरस होता एक रुपानें, वियोग मिटतो क्षणाक्षणानें
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com
Leave a Reply