गुरुर्र रमः
गुरुर्र व्हिस्की
गुरुर्र वाईन
जिनेश्वरः
मद्य साक्षात परब्रह्म
तस्मै श्री बियरे नमः
याची आठवण येण्याचे कारण म्हणजे राज्यात एकीकडे दारुबंदी लागू असतानाही मद्याच्या विक्रीत दरवर्षी वाढ होतच आहे. दरवर्षी ८० कोटी लिटरची मद्यविक्री एकट्या महाराष्ट्रातून होते. म्हणजे शतक गाठायला काही जास्त काळ थांबायला लागणार नाही. महाराष्ट्र शासनाला एकूण महसूलापैकी तब्बल आठ टक्के वाटा मद्यविक्रीतून मिळतो.
मद्यनर्मिती, वाहतूक आणि विक्री यावर संपूर्ण नियंत्रण राज्य उत्पादन शुल्क विभागाचे असते. या विभागाचे कामकाजच मुळी `महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९’ मधील तरतूदींनुसार चालते. मार्च २०१४ पर्यंत मद्यविक्रीच्या माध्यमाद्वारे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तब्बल १०,००० कोटींहूनही जास्त महसूल गोळा होणार असल्याचा अधिकृत अंदाज आहे. महसूल वसूलीत राज्यात नेहमीच विशेष पुरस्कार मिळविणार्या या विभागाने आता केंद्रीय पातळीवरही पहिल्या पाचात स्थान पटकावले आहे.
महाराष्ट्रात देशी मद्यनिर्मितीचे ४१, विदेशी मद्यनिर्मितीचे ४७, बिअरचे ११ आणि वाइन बनविणारे ७१ कारखाने आहेत. राज्याची मद्याची बहुतांशी मागणी यातून पुर्ण होते. मात्र रंगीन आणि शौकीन मंडळी मोठ्या संख्येने विदेशी मद्याची विविध मार्गाने आयात कर
तच असतात.
महाराष्ट्रात बनलेले देशी मद्य परराज्यात निर्यात करण्यास अथवा परराज्यातून आयात करण्यास बंदी आहे. विदेशी मद्य, बिअर आणि वाइन यांच्या निर्यात/आयातीवर निर्बंध नाहीत. मद्यनिर्मिती कारखान्यातून निघालेले मद्य अथवा परदेशातून आयात झालेले विदेशी मद्य यावर पूर्ण उत्पादन शुल्क व इतर शुल्क आकारूनच घाऊक विक्रेत्याकडे अशा मद्याची आवक होते. किरकोळ विक्रेत्यांकडून कोणत्याही प्रकारचे उत्पादन शुल्क आकारले जात नसून केवळ त्यांच्या दुकानांना दिलेल्या अनुज्ञप्तीसाठी (परवाना) वार्षिक शुल्क आकारले जाते.
शेजारच्या राज्यातून अवैध मद्याची तस्करी होऊ नये यासाठी सध्या १२ सीमा तपासणी नाके आहेत. याव्यतिरिक्त २२ कायमस्वरुपी अत्याधुनिक तपासणी नाके राज्यांच्या सीमेवर परिवहन आणि विक्रीकर विभागाच्या समवेत राज्य शासनाकडून उभारण्यात येत आहेत.
राज्यात देशी मद्याचे २२१ तर विदेशी मद्याचे २२५ घाऊक विक्रेते आहेत. या ठोक विक्रेत्यांच्या माध्यमातून मद्याची वाहतूक किरकोळ विक्रेत्यांकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियंत्रणाखाली होते.
राज्यात सीलबंद विदेशी मद्याच्या बाटल्यांची विक्री करणारी १८५० दुकाने असून विदेशी मद्याचे तब्बल ११,१६७ अधिकृत बार आहेत. याशिवाय सीलबंद बिअर विक्रीची ४,२५७ दुकाने आहेत. देशी मद्य किरकोळ विक्रीची ३,६२५ दुकाने राज्यात कार्यान्वित आहेत.
राज्यात मद्यप्राशन, वाहतूक आणि मद्य जवळ बाळगणे यासाठी राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवसासाठी दोन रुपये, वर्षांसाठी १०० तर आणि आजीवन परवान्यासाठी १००० रुपये आकारले जातात.
कुठल्याही कार्यक्रमात मद्याचा वापर केला जात असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. वाइनसाठी ७५० रुपये भरून तर विदे
ी मद्य, बिअरसाठी ८,०५० रुपये भरून एक दिवसाचा तात्पुरता परवाना दिला जातो. हा परवाना न घेतल्यास कारवाई केली जाते.
केवळ दोन रुपयात दिवसभर दारु पिण्याची आणि ८,०५० मध्ये दिवसभर दारु पाजण्याची सोय करुन देणारे हे राज्य दारुबंदीचाही पुरस्कार करते हा तर खरा फार मोठा विनोद आहे.
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply