धातूंचे आणि त्यांच्या संमिश्रांचे जे अगणित उपयोग आहेत त्यातील काही माणसाच्या शरीरातदेखील केले जातात. दातांमध्ये भरण्यासाठी वापरली जाणारी चांदी किंवा मोडलेल्या हाडांना जोडण्यासाठी आणि आधार | देण्यासाठी धातूंच्या पट्ट्यांचा उपयोग केला जातो.
किडलेले दात स्वच्छ करताना, कीड लागलेला दाताचा भाग काढून टाकला . की दातांत एक पोकळी उरते. ही पोकळी भरून काढली नाही तर त्यात अन्नकण अडकून पुन्हा दात किडणे सुरू होऊ शकते. दातातल्या पोकळीत भरण्यासाठी पारा आणि चांदी यांचे संमिश्र वापरले जाते. हे वापरण्याची मुख्य कारणे म्हणजे चांदी पाऱ्यामध्ये सहज विरघळते आणि एक मऊ संमिश्र तयार होते जे दातामधल्या पोकळीत सहज भरता येते. दाबून भरलेले हे संमिश्र पोकळीचा आकार घेते. सुरुवातीला मऊ असणारे हे संमिश्र थोड्याच वेळात टणक होऊ लागते आणि F चावण्याच्या क्रियेमध्ये ते घासून निघून जात नाही.
शिवाय चांदीची गंजरोधकता खूपच जास्त असल्याने अन्नातील च्याचा कृत्रिम सांधा आम्लांचा त्यावर काहीच परिणाम होत नाही. संपूर्ण दातावर जे आवरण बसविले जाते त्यासाठी मात्र पारा-चांदी या संमिश्राचा वापर करीत नाहीत; कारण त्याचा पत्रा बनू शकत नाही. त्यासाठी पूर्वी सोन-ताब या संमिश्रांचा वापर केला जाई. मुख्य कारण सोन्याची रासायनिक अक्रियाशीलता. परंतु हल्ली त्याकरिता स्टेनलेस स्टीलचा वापर करतात. दातांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संमिश्राचा रक्ताशी संबंध येत नाही. पण हाडांना आधार देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पट्ट्या मात्र रक्ताशी सरळ संपर्कात येतात. या संमिश्राकरिता गंज आणि रसायनरोधकतेबरोबर शरीराची त्यांना सामावून घेण्याची क्षमता हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा ठरतो.शरीरात आलेल्या धातूला शरीराच्या संरक्षण यंत्रणेने अनावश्यक किंवा अपायकारक ठरविले तर शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. या सर्व बाबींचा विचार करता स्टेनलेस स्टील गटातली काही संमिश्रे आणि टायटॅमिअम हा धातू आणि त्याची संमिश्रे हाडांना सांधण्यासाठी किंवा आधार देण्यासाठी वापरली जातात.
योगेश सोमण, चेन्नई
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply