हल्ली कोणत्याही प्रकारचा रोगी जर फारच अत्यवस्थ असेल तर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका वापरल्या जातात. पण शहरातील रहदारीची स्थिती, वाढती वाहतूक, वाहनांची गर्दी, वाहतुकीच्या नियमाबद्दलची अनास्था यामुळे रुग्णालयापर्यंत पोचण्यास फार वेळ लागतो.
तरी पण रुग्णाला त्याचा फायदा होतो. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला मात्र तक्रार सुरू झाल्यापासून ४ ते ६ तास फार धोक्याचे असतात. कारण बहुतेक जीवघेणे बिघाड याच वेळात होतात. तेव्हा जगात सर्वच देशात यावर मात करण्याचे प्रयत्न गेल्या ६० वर्षांपूर्वी सुरू झाले आहेत. १९६८ साली आयर्लंडमधील डॉ.? ?पॅन्ट्रीज यांना हृदयरोग्यासाठी विशिष्ट प्रकाराची रुग्णवाहिका बनवण्याची कल्पना आली. यामध्ये हृदयाच्या आलेखावर इ.सी.जी. लक्ष ठेवणे व त्यात अनपेक्षित बदल झाल्यास तात्काळ विद्युतप्रवाहाचा झटका देणे, प्राणवायुचा पुरवठा चालू ठेवणे, हृदयाच्या रक्तवाहिन्यातील रक्ताच्या गुठळ्या विरघळणारी औषधे देणे
(३ तासांच्या आत दिल्यास) आणि जरूरीप्रमाणे इतर सर्व प्रकारांची औषधे देणे वगैरे सोयी उपलब्ध केल्या गेल्या.
कोणालाही केव्हाही छातीत दुखू लागल्यास विशिष्ट दूरध्वनी फिरवून या रुग्णवाहिकेस बोलावणे शक्य झाले. तसेच रुग्णापर्यंत पोचण्याचा आणि औषधोपचार सुरू करण्याचा वेळही ५०% कमी झाला. रुग्णाचा प्रवास चालू असताना बिनतारी पद्धतीने त्याचा इ.सी.जी. केंद्रीय अतिदक्षता विभागाकडे पाठवून तेथील डॉक्टरांचा सल्लाही घेतला जातो.
याच पार्श्वभूमीवर रुग्णाला अतिजलदरित्या रुग्णालयात पोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर प्रगत देशात होऊ लागला आहे. एअर अॅम्ब्युलन्सस प्रायोगिक पातळीवर अॅन्जिओग्राफी व अॅन्जिओप्लास्टीही एका विशिष्ट प्रकारे बनवलेल्या बसमध्ये केली जाते. ही बस रुग्ण जेथे असेल तेथे घेऊन जाऊन धोक्यात आलेल्या हृदयाच्या स्नायूचा रक्तप्रवाह पूर्ववत केला जातो. या सर्व गोष्टीमुळे एकाएकी हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णातील स्नायूला वाचवून प्रमाण ५०% हून जास्त कमी मृत्यूचे झाल्याचे आढळले. त्यामुळे ‘वेळ राठी विज्ञान परिषद म्हणजे स्नायू’ ही म्हण प्रचलित झाली. आपल्या समाजात हा रोग फक्त उच्चभ्रू लोकांनाच होतो असा गैरसमज आहे. खरे तर सर्व स्तरात हा समप्रमाणात प्रचलित आहे. पण त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. तसेच चांगले रस्ते, शिस्तबद्ध वाहतूक व आधुनिक सुसूत्र संपर्कसेवा यांची अत्यंत गरज आहे.
डॉ. पुरुषोत्तम अ. काळे
मराठी विज्ञान परिषद,
Leave a Reply