विषाणूंमुळे होणाऱ्या नागीण या रोगाविषयी समाजात अनेक गैरसमज प्रचलित ाहेत. एका बाजूने सुरू झालेले पुरळ शरीराभोवती संपूर्णपणे दुसऱ्या बाजूपर्यंत पसरून त्याची दोन्ही तोंडे एकमेकांना मिळाली तर आजाराचे स्वरूप गंभीर होते, असा एक गैरसमज आहे; परंतु यात अजिबात तथ्य नाही. चेतासंस्थेला विषाणूंची बाधा होत असल्याकारणाने हा रोग साहजिकच चेतासंस्थेच्या अनुषंगाने वाढत जातो. त्यामुळे नागीणीने विळखा घातल्यासारखा आभास होतो; परंतु नागीण या रोगाचा नागीणीशी सुतराम संबंध नाही.
रुग्णाची प्रतिकार क्षमता कमी झाल्यास हा रोग जास्त प्रमाणात वाढत जातो, पसरतो व त्वचेच्या खोलवरील नागीण स्तरापर्यंत पोहोचतो. ‘बेल्स पालसी’ नावाचा चेहऱ्याच्या विशेषतः जबड्याच्या ठरावीक स्नायूंना कमकुवत करणाऱ्या रोगाच्या मुळाशी नागीणीचे विषाणू कारणीभूत असू शकतात. नागीणीची बाधा चेहऱ्यावरची त्वचा, तोंड, ओठ, बोटे, डोळ्यांच्या पापण्या, पोट, छाती, पाठीची त्वचा, फुप्फुसे, आंतरंगातील काही अवयव किंवा जननेंद्रिये अशा ठिकाणी होते. काही वेळा मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचतो (एनकिफॅलायटीस) क्वचित प्रसंगी आईला किंवा घरातील कोणा व्यक्तीस ही बाधा झाली असल्यास जन्मजात बालकाच्या अंगावर असे फोड येऊ शकतात.
फोड व त्याखाली पाण्यासारखे आजूबाजूच्या त्वचेवर लाली येणे हे याचे प्रमुख लक्षण आहे. प्रयोगशाळेत त्यातील लस तपासून या रोगाचे योग्य निदान होऊ शकते. व्रणातील लस लागून आजूबाजूच्या त्वचेवर असे फोड येतात. साधारणतः पन्नाशीच्या आसपास असलेल्या व्यक्तींमध्ये ही लागण जास्ती प्रमाणात दिसते. तोंडातील लागण ही लहान व तरुण मुले यांच्यात दिसून येते. या रोगावर ‘असायक्लोवीर’ यासारखी औषधे उपयोगी ठरतात. अशा विषाणू प्रतिरोधक औषधांमुळे मराठी वि लक्षणांची तीव्रता कमी होते व रोग आटोक्यात येण्यास मदत होते.
याव्यतिरिक्त रुग्णाची प्रतिकार विज्ञानं जनहितारा क्षमता वाढविणे गठील पान हा एक प्रभावी प्रतिबंधक उपाय आहे. एकंदरीत शरीराची प्रतिकार क्षमता वाढविणे हा अशा व इतर अनेक रोगांना दूर ठेवण्याचा यशस्वी उपाय आहे.
-डॉ. विनोदिनी प्रधान
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply