आपल्या स्वप्नांसह
आकाशात उंचच उंच
उडण्यासाठी काहींना
लाभलेले असतात
गरूडाचे पंख…
पण काही पालक
त्याकडे दुलर्क्ष करून
आपल्या पाल्याला
त्यांच्या अपेक्षांचे ओझे
वाहणारे गाढव
करून सोडतात…
गाढव झालेल्या
त्यांच्या किकांळण्याचा आवाजही
त्यांच्या कानापर्यत
कधीच पोहचत नाही…
त्यांच्या स्वप्नांची पंखे
झडून गेल्यावर
ते निष्प्राण होऊन
उकीरड्यावर लोळ्त पडतात…
तेंव्हा कदाचित होतही असेल
पालकांना जाणिव
आपल्या अक्षम्य गुन्हयांची…
पण तोपर्यत
खूपच उशिर झालेला असतो
कारण तेंव्हा त्यांना
उकिरड्यावर लोळ्ण्याची
सवय झालेली असते
आणि आकाशात उडण्याचा
कंटाळा आलेला असतो…
कवी – निलेश बामणे.
Leave a Reply