कार्तिक शुक्ल चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात. या दिवशी हरि-हरांचे (विष्णू-शिव) यांचे पूजन करण्यास सांगितले आहे. सामान्यतः शिव पूजनासाठी निशिथ काळ श्रेष्ठ असतो. परंतु या दिवशी निशिथ कालात विष्णूंची पूजा करून अरूणोदयी शिवांची पूजा करण्यास सांगितले आहे. यावरून असे वाटते जेव्हा शैव – वैष्णव यांच्यातील मतभेद पराकोटीला गेले त्या वेळेपासून हे व्रत सुरु झाले असावे. या व्रतामुळे मतभेद कमी होण्यास नक्की मदत झाली असेल. हा दिवस या दोन देवांच्या भेटीचा मानला जातो. या दिवशी नाममंत्राने सहस्त्र कमळे वाहणे हे वैशिष्ट्य आहे. याची कथा – एकदा विष्णू वैकुंठाहून वाराणशीला आले. रात्रीच्या चौथ्या प्रहरांत स्नान करून सहस्त्र कमळे गोळा करून शिवांची पूजा सुरु केली. विष्णूंची कसोटी पाहण्याचे ठरवून शिवांनी एक कमळ लपविले. शेवटी एक कमळ कमी पडले. पूजेवरून उठावे तर पूजेचा भंग होणार असा विचार करून त्यांनी स्वतःचे नेत्रकमळ भगवान शिवांना अर्पण केले. शिव प्रसन्न झाले. विष्णूंना त्रैलोक्याचे राज्य दिले व दुर्जनांच्या संरक्षणासाठी सुदर्शन चक्र दिले. ही तिथी कार्तिक शुक्ल चतुर्दशी होती. तेव्हापासून या तिथीला वैकुंठ चतुर्दशी नांव पडले.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply