माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. या सप्तमीला अचला सप्तमी, जयंती सप्तमी, भास्कर सप्तमी अशी अन्य नांवे सुद्धा आहेत.
या दिवशी रक्तचंदनाचे सात घोड्यांचा रथ, त्यावर अरूणासह सूर्य प्रतिमा काढावी. ‘ध्येय सदा’. या मंत्राने ध्यान करून पूजन करावे. गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या सुघडात दूध ठेवतात व ते सूर्याला अर्पण करतात. या व्रताच्या आचरणाने आरोग्य प्राप्ती होते असे शास्त्रांत सांगितले आहे. या दिवशी शहरात सुद्धा अनेक घरी गॅसवर दूध ऊतू घालवितात.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply