एकाच्या खांदयावर बंदूक ठेऊन
हल्ली कोणीच
दुसर्याचा गेम करीत नाही…
ज्याचा गेम करायचा आहे
त्याचाच खांदा वापरतात
बंदूक ठेवण्यासाठी…
खांदा मोकळा ठेवणे
हल्ली धोक्याचे झाले आहे
कोणाच्याही ओझ्यासाठी…
हल्ली लोक
मोकळा खांदा शोधत
फिरत असतात वेड्यासारखी…
मोकळ्या खांद्यावर
स्वतःहू स्वतःचीच्
काही ओझी वाहत राहवी…
आपला खांदा मोकळा झाला की
समजवं वेळ जवळ आलेय
आपला गेम होण्याची…
कवी
– निलेश बामणे.
— निलेश बामणे
Leave a Reply