नवीन लेखन...

बेएरिया

सॅनफ्रन्सिस्कोच्या दक्षिणेला काही मैलांवर सॅनहोजे, फ्रिमाँट, डब्लिन, लिव्हरमोर, प्लेझंटन ही शहरे येतात. पॅसिफिक महासागर आणि सॅनफ्रान्सिस्को बे हे दोन्ही समुद्रकिनारे असल्याने इथली हवा आपल्या मुंबईकडे असते तशीच असते. पण इथले हवामान लहरी आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ टेसला याच्या नावाने इथे एक मोटार बनवण्याची फॅक्टरी आहे. सॅनहोजे परिसरात अनेक सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. त्यामुळे त्यात काम करणारे प्राय: भारतीय आहेत. त्यातही आंध्र, कर्नाटक परिसरातील तरुण मोठ्या प्रमाणावर इकडे येतात. मराठी तरुणांची संख्याही चांगली असून त्यांच्यामुळे त्यांचे नातेवाईक ही इथे वर्षभर येत असतात. गुजराती पटेल, पंजाबी ही मंडळी इथल्या हॉटेल व्यवसायात स्थिरावलेली दिसतात. ‘न्यू इंडिया’, ‘चाटभवन’, ‘अमरावती’, ‘अम्मा’, ‘वेदांत’..अशी कितीतरी ग्रोसरी शॉप्स आणि हॉटेल्स प्रसिद्ध आहेत. पुष्कळसे भारतीय इथे येतात. कारण त्यांच्या आवडीच्या देशी वस्तू इथे मिळताच. त्याचबरोबर अन्य लोकही या दुकानांना आणि हॉटेल्सना भेटी देतात. भारतीय अन्नपदार्थ इकडील लोकांना पसंत पडू लागल्याची ती खूण आहे.

इथल्या थिएटर्सना कधीकधी हिंदी चित्रपट लागतात आणि रसिकही त्यांना छान प्रतिसाद देतात. प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि त्याचा पाकिस्तानी सहगायक यांच्या संयुक्त गायनाचा एक कार्यक्रम काही वर्षांपूर्वी इथल्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. दोन्ही देशांतील प्रेक्षकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला होता. “पीके” हा सिनेमा इथल्या थिएटरला जाऊन आम्ही पाहिला होता. इकडे महाराष्ट्र मंडळे कार्यरत असतात. मराठी सण-उत्सव ते उत्साहाने साजरे करतात. नाटके-गाणी बसवतात. मुंबईतल्या नाट्यसंस्थांना, साहित्यसंस्थांना ते निमंत्रणे देतात. त्यांचे कार्यक्रम घडवून आणतात.

इथे राधाकृष्णाचे, विष्णूचे, व्यंकटेशाचे अशी मंदिरे आहेत. तिथे भक्तीपर कार्यक्रम होतात.

इथे अगणित इमारतींची संकुले असतात. ती बैठी असतात. त्यांच्यामध्ये ‘वालमार्ट’, ‘वालग्रीन’, ‘सेफवे’, ‘बेबीज आर अस’, ‘फॅक्टरी लेआउट्स’, ‘बार्नस अँड नोबल’, ‘फ्राईज’, ‘बेस्टबाय’ सारखी शोरूम्स आणि दुकाने असतात.

‘मायकेल’ नावाच्या दुकानाच्या दर्शनी भागात एका काचेच्या केबीनमध्ये एक वृद्धा तीनचार बायकांना चित्रकला शिकवीत होती. त्यापैकी एक भारतीय होती. स्टँडवर फलक लावलेले होते आणि त्यावर जलरंगात बऱ्यापैकी निसर्गचित्रे रंगवलेली होती.

“लहानपणापासून चित्रे काढण्याची मला आवड होती; पण ती राहून गेली.’

असे सहज मी तिला म्हटले.

“अजूनही तू माझ्या क्लासला तू येऊ शकतोस. मी तुला शिकवीन.”

ती म्हणाली.

या लोकांच्या जिद्दीचे मला कौतुक वाटले.

फ्रीमाँटच्या आरडनवूड भागातल्या शाळेच्या आजूबाजूला बरेच भारतीय राहतात. तिथे दररोज संध्याकाळी पाच वाजता त्यांचा लाफिंगक्लब भरतो. गेल्या पंचवीस वर्षांपासून तो तिथे भरत आहे. बदलत्या काळानुसार माणसे बदलतात. पण क्लब अखंड चालू आहे.

क्लास संपल्यावर काही दक्षिणी, गुजराती, पंजाबी, मराठी वृद्ध शाळेसमोरील बाकांवर बसून गप्पा मारतात. भारतीय राजकारणातील घटनांसंबंधी चर्चा करतात. त्यापैकी कोणाला ग्रीनकार्डविषयी, कोणाला आजाराविषयी अशा अडचणी वा शंका असतात. सूर्यास्तानंतर आपापली वेळ झाली की ते निघून जातात:

तिथे नाईक नावाचे नव्वदीच्या घरातले गृहस्थ नेहमी येत असतात. उंचपुरे, निरोगी, हसरे, काळेसावळे. हे गृहस्थ विधूर आहेत. मुलगा, सून, नातवंडे कित्येक वर्षे इथेच राहतात. म्हणून हे त्यांच्याबरोबर त्यांचा एक मुलगा हाँगकाँगला. तरुणपणी ते मुंबईला होते. मुळचे कोकणातले. त्यांनी स्वत:ला इथे जुळवून घेतले आहे. क्लबला ते नियमित येतात. व्यायाम करतात.

“मुंबईच्या, कोकणातल्या आठवणी येतात का? ”

असे विचारल्यावर,

“येतात, पण झटकून टाकतो मी त्या. कोणी उरले नाही. बायको गेली. मित्र गेले. जागाही विकून टाकली.”

खिन्नपणे ते म्हणाले.

एकदा सकाळी भयंकर थंडी असतानादेखील जवळजवळ धावतच आपल्या नातीला शाळेत पोहोचवायला ते आले होते.

“नाईक, नाईक.”

मी त्यांना जोराने हाक मारली.

ती त्यांना बहुतेक ऐकू गेली नसावी.

एक पाय ओढीत ते तसेच चालत निघून गेले.

– बे एरिया परिसरात सर्वसाधारण असे वातावरण असते.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..