स्वीडनमध्ये आता लोकांना टॅब्लेट, संगणक आदी तांत्रिक, डिजिटल उपकरणांचा कंटाळा आल्यामुळे मुलांचे डिजिटल शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर आहे. या ऐवजी आता पुन्हा वही व पेन म्हणजे लिहिण्याला प्रोत्साहन देण्याची याच शैक्षणिक सत्रापासून सुरुवात झाली आहे. आता स्वीडनमधील सर्व प्राथमिक शाळा मुलांना टॅब्लेटऐवजी लिहिण्याचा सराव करण्यावर भर देत आहेत.
हे बदल तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार होत आहेत. शिकण्याची जुनी पद्धतच योग्य असल्याचे शैक्षणिक तज्ज्ञांचे मत आहे. कारण शिशुवर्गात टॅब्लेट आणि डिजिटल उपकरणामुळे मुलांचे मूलभूत कौशल्य खूपच कमी झाले आहे. स्वीडनच्या शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, आम्ही ६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना डिजिटल शिक्षण देणे पूर्णपणे बंद करीत आहोत. स्वीडनची शैक्षणिक गुणवत्ता युरोपियन देशांच्या तुलनेत उच्च दर्जाची आहे. परंतु, ४ थ्या इयत्तापर्यंतच्या मुलांची शिकण्याची पातळी २०१६ ते २०२१ या पाच वर्षांत खूपच घसरली आहे. यामुळे पुन्हा पारंपरिक पद्धतीचे शिक्षण सुरू करून लहान मुलांसाठी डिजिटल शिक्षण पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय स्वीडनच्या शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे.
टॅब्लेटचा वापर सुरू झाल्यामुळे मुलांचे हाताने लिहिणे बंदच झाले आहे. यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. स्वीडनला सुचलेले हे शहाणपण जगाला कधी सुचणार?
Leave a Reply