नवीन लेखन...

ओटीटी माध्यमाने प्रेक्षकांची एकाग्रता क्षमता कमी केली

मी माझ्या चित्रपट निर्मितीची सुरुवात डिजिटल युगात केली. माझा ‘पुणे ५२’ हा कदाचित डिजिटल तंत्राचा वापर केलेला पहिला मराठी चित्रपट असावा. बदलत्या तंत्राचे भान असलेला दिग्दर्शक असल्याने त्याचा उपयोग मी चित्रपट निर्मितीमध्ये करत असतो.

निखील महाजन – चित्रपट दिग्दर्शक

साभार : रुपवाणी


आजच्या काळातील चित्रपटांच्या आशयाबद्दल बोलायचे तर दोन टोकाचे प्रवाह आपल्याला आढळतात. एका बाजूला वास्तववादी चित्रपट निर्माण होत आहेत तर दुसऱ्या बाजूला विज्ञानपट, सुपरहिरो, बिगबजेटचे मसालापट बनवले जात आहेत. या दोन्ही प्रकारांचा सुवर्णमध्य साधणाऱ्या चित्रपटांची निर्मिती दुर्मीळ होत आहे. आजच्या चित्रपट निर्मितीमध्ये डिजिटल तंत्राने मोठा बदल घडवला आहे. सर्वत्र व्हीएफएक्स तंत्राचा वापर हा एक ठळक बदल आपल्याला दिसून येतो आहे.

मी माझ्या चित्रपट निर्मितीची सुरुवात डिजिटल युगात केली. माझा ‘पुणे ५२’ हा कदाचित डिजिटल तंत्राचा वापर केलेला पहिला मराठी चित्रपट असावा. बदलत्या तंत्राचे भान असलेला दिग्दर्शक असल्याने त्याचा उपयोग मी चित्रपट निर्मितीमध्ये करत असतो.

ओटीटी माध्यमाने विशेषता वेबसिरीजने प्रेक्षकांची एकाग्रता क्षमता कमी केली, हा चित्रपट संस्कृतीमध्ये झालेला ठळक बदल मला जाणवतो. चाळीस पन्नास मिनिटांचा एक भाग पाहून ब्रेक घेण्याच्या सवयीमुळे प्रेक्षक पूर्ण लांबीच्या चित्रपटांना प्रतिसाद देइनासे झाले आहेत. प्रेक्षकांना चित्रपट संथ वाटू लागले आहेत कारण चाळीस मिनिटानंतर येणारा ब्रेक त्यांना आता आवश्यक वाटतो. ओटीटी माध्यमाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रेक्षकांना आता जगभरातील उत्तमोत्तम कलाकृती घरबसल्या पाहायला मिळत आहेत, त्यामुळे स्वाभाविकच भारतीय चित्रपटांकडूनसुद्धा त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांचा एकूण चित्रपट संस्कृतीवर फार थोडा प्रभाव पडतो असं मला वाटतं. फिल्म फेस्टिवलमुळे विशिष्ट प्रकारचे चित्रपट एका प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचतात मात्र हे चित्रपट व्यावसायिक पातळीवर किती यशस्वी होतात याची माहिती मात्र कुठे उपलब्ध होत नाही.

निखील महाजन
चित्रपट दिग्दर्शक

साभार : रुपवाणी 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..