नमस्कार
मी, प्रिया उपासनी, एक भारतीय नागरिक. भारत एक विकसनशील देश आहे. भारतात सद्ध्या खूप बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. रोज आपण पुढे पुढे जात आहोत. दररोज आपण प्रगती करत आहोत. पण खरच आपण प्रगती करत आहोत का? आपला देश कृषिप्रधान देश आहे आणि त्यापासून आपण दूर जात आहोत असे चित्र दिसत आहे. प्रगती, विकास जरूर व्हावा पण प्रकृतीकडे, पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले नाही पाहीजे. दुर्दैवाने आज परिस्थिती बरोबर विरुद्ध दिसत आहे.
सुपिक शेतजमिनी विकल्या जात आहेत. त्यावर मोठमोठ्या इमारती बांधण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याची, रस्त्यांची, विजेची व्यवस्था या संबधीत कोणताही विचार केला जात नाही. हे शहरी भागांपूरते मर्यादित नसून गावागावात सुद्धा हे चित्र दिसायला लागले आहे.
गावांना शहरांना जोडण्यासाठी मोठमोठे रस्ते पूल बांधण्यात येत आहेत. त्यासाठी लाखो हेक्टर शेतजमीनी सरकार ताब्यात घेत आहे. त्याबद्दल जमिन मालकांना मोबदलाही मिळत आहे. पण शेती उत्पादनाचे काय?
काही सामाजिक संस्था पर्यावरणासाठी खूप काम करत आहेत. पण आपण सर्वांनीच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करायला पाहीजे.
देशाचा विकास, देशाची प्रगती गरजेचीच आहे. पण ज्या पर्यावरणमुळे , शेतीउत्पादनामुळे आपण करोनासारख्या मोठ्या संकटाचा सामना यशस्वीपणे करू शकलो त्याचा विचार केला पाहीजे. आपल्या देशाची प्रगती व्हावी पण प्रकृतीचा विनाश करून नाही तर त्याचा समतोल साधून हाच आपण नविन वर्षाचा संकल्प करूया…
प्रिया नितीन उपासनी
माहीम मनपा माध्यमिक शाळा
मुंबई
Leave a Reply