ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९२७ रत्नागिरी येथे झाला.
रत्नागिरी येथे स्वा.सावरकर यांचे घर शेजारीच असल्याने लहानपणापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते.स्वा.सावरकर त्यांना मुलगी मानत असत.शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘इन्किलाब’ ही कादंबरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरुजी यांच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्राय स्वाहा’ कादंबरी, शंकर महाराज यांच्या जीवनावर आधारित शंकरलीला, पावसचे स्वामी स्वरूपानंद यांच्या जीवनावर आधारित अमॄतसिद्धी, स्वा. सावरकर यांच्या जीवनातील अंतिम कालखंडावरील ‘अवध्य मी! अजिंक्य मी!!’ ही कादंबरी हे त्यांचे साहित्य गाजले ‘इन्किलाब’ या कादंबरीचे हिंदी, इंग्रजी व गुजराथी या भाषांमध्ये तर ‘राष्ट्राय स्वाहा’ या कादंबरीचे हिंदी व तेलुगू भाषेत अनुवाद झाले आहेत. चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद, आचार्य रजनीश ‘ओशो’, दत्तोपंत ठेंगडी, बाळासाहेब देवरस, अटल बिहारी वाजपेयी व जगन्नाथराव जोशी अश्या अनेक मोठ्या व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला होता. ज्योतिष शास्त्राचीही त्यांना आवड होती.
देशभक्त,अध्यात्मिक व्यक्तींचे चरित्रलेखन व काव्यलेखन यांसाठी त्यांची ओळख होती. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने मॄणालिनी जोशी यांनी लिखाणाला सुरवात केली. कुसुमाग्रज स्वतःच्या वाढदिवसाला दरवर्षी एक नवी कविता लिहून मॄणालिनीताईंना पाठवत असत.तसेच पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या त्या अनुग्रहित शिष्या होत्या. संत तुकारामांच्या पत्नी जिजाई यांच्या जीवनावरील आनंदाचे डोही आनंद तरंग आणि समर्थ रामदासांच्या शिष्या संत वेणाबाई यांच्या जीवनावरील वेणास्वामी या कादंबऱ्या, चांगदेव पासष्टीचे अभंगावरील रसाळ भाषेतील निरूपण असलेले स्वस्तिश्री हे पुस्तक हे त्यांचे अन्य साहित्यही प्रसिद्ध आहे. जीवनात भेटलेल्या संत-महंतांच्या सहवासातील आठवणींवर आधारित ‘आलोक’ हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक त्यांनी लिहिले आहे.
त्यांना २००६ साली डॉ. वि.रा. करंदीकर यांच्या हस्ते स्नेहांजली पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद, आचार्य रजनीश ‘ओशो’, दत्तोपंत ठेंगडी, बाळासाहेब देवरस, अटलबिहारी वाजपेयी, जगन्नाथराव जोशी अश्या अनेक मोठ्या व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला होता. ज्योतिष शास्त्राची आवड असलेल्या जोशी यांचे म.दा भट आणि व. दा भट या दिग्गजांशी संबध होते.
मृणालिनी जोशी यांचे २७ ऑक्टोबर २०२२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply