नवीन लेखन...

बॉनसायचे प्रकार

बॉनसायच्या आकारानुसार त्यांचे चार प्रकारांत वर्गीकरण करता येते. मोठे बॉनसाय दोन -तीन फूट उंचीचे असते. मध्यम बॉनसाय एक- दोन फूट उंचीचे असते. मिनिएचर बॉनसाय दोन ते सहा इचं उंच असते.

बॉनसायला किती बुंधधे आहेत, त्याप्रमाणे एक बुंधा असलेले, दोन बुंधे असलेले अथवा दोनपेक्षा जास्त बुंधे असलेले बॉनसाय अशी बॉनसायची विभागणी होते. एका ट्रेमध्ये किती झाडे आहेत, यावरुन एकच झाड, दोन झाडे अथवा जंगल स्टाइल असे बॉनसायच्या खोडाचा आकार आणि रचना यावरुन बॉनसायचे सरळ उभे ,उभे पण वाकडे-तिकडे, तिरके, अर्धवट झुकलेले धबधब्याप्रमाणे, पूर्ण खाली झुकलेले, वळणावळणांचे असे प्रकार आहेत.
फांद्यांच्या ठेवणीवरुन बॉनसायचे ब्रूम म्हणजे झाडूप्रमाणे विंड स्वेफ्ट असे प्रकार आहेत. मुळांच्या ठेवणीनुसार बॉनसायचे एक्स्पोज्ड, राफ्ट, असे प्रकार आहेत. बॉनसाय ही फुले /फळे येणारी अथवा न येणारी शोभिवंत झाडे असू शकतात. फुले येणार्‍या बॅनसायची फुले अथवा फळे निसर्गात आढळणार्‍या त्याच्या मूळ झाडाच्या फुलांच्या रंगाची वासाची असतात. फक्त आकाराने लहान असतात.
फुले व फळे येणार्‍या बॉनसायला मोठ्या झाडांना ज्या ऋतूमध्ये फुले आणि फळे येतात,त्याच ऋतूत फुले आणि फळे येतात. बॉनसायच्या फळांचा रंग, चव त्याच प्रकारच्या मोठ्या झाडाप्रमाणेच असतात. रोपवाटिकेतून फळांची कलमी रोपे घेऊन त्यांचे बॉनसाय बनवल्यास त्यांना फलधारणा लवकर होते. आपल्या भागामध्ये, वातावरणामध्ये उत्तम प्रकारे वाढू शकणार्‍या प्रजातींची निवड बॉनसाय बनवण्यासाठी करावी. शक्यतो भरपूर फांद्या असणारी, जवळजवळ आणि आकाराने लहान पाने असणारी झाडे किंवा प्रजाती बॉनसाय करण्यासाठी निवडाव्यात. पामवृक्ष किंवा नारळाप्रमाणे एकच फांदी असणार्‍या प्रजाती बॉनसाय करण्यासाठी निवडू नयेत.
सर्वसाधारणपणे वड, पिंपळ, अंजीर पेरु, अडुळसा, चिंच चेरी आंबा, विलायतीचिंच, लिंबू, संत्री, मोसंबी ही सहजपणे उपलब्ध होऊ शकतील अशी झाडे बॉनसाय करण्यासाठी निवडली जातात.

— मानसी भिर्डीकर
मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..