नवीन लेखन...

मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्यात आले

२४ फेब्रुवारी
आजच्याच दिवशी १९६१ मध्ये मद्रास राज्याचे नाव बदलून  तामिळनाडू असे करण्यात आले आहे.मद्रास हे नाव इंग्राजामुळे भारतात रुजले होते.भारतात पाय रोवल्यानंतर १६३९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने जमीन खरेदी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास पोर्ट आणि फोर्ट सेंट जॉर्ज, सेंट मेरीज चर्च तयार केले. मदर मेरी मुळे इंग्रज त्या ठिकाणाला मद्रास म्हणत होते. मद्रास राज्याचे नामकरण होण्यासाठी पेरियार रामास्वामी यांची चळवळ कारणीभूत ठरली. पेरियार यांनी १९२५ मध्ये स्वतःची ओळख आणि स्वाभिमान जागविण्यासाठी चळवळ सुरु केली. त्यांनी पहिल्यांदा द्राविड लोकांचे हक्काचे घर म्हणून द्राविड नाडू (नाडू म्हणजे राष्ट्र) हा शब्द पुढे केला. पेरियार यांनी द्राविडार कझागम (Dk – Dravidar Kazhagam) नावाचा पक्ष काढून तामिळ, मल्याळम, तेलगू आणि कन्नड भाषिक लोकांच्या अस्मिता जागविण्याचा प्रयत्न केला. पेरियार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच सामाजिक क्रांतीच्या कामासाठी ओळखले जातात. वंचित समाज, महिला यांना हक्कांची जाणीव करुन देत असतानाच त्यांनी हिंदी भाषेला विरोध आणि तामिळ संस्कृतीच्या संवर्धनाचा मुद्दा पुढे नेला.अण्णादुराई हे तामिळनाडू राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..