ज्येष्ठ शास्त्रीय गायक व संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचा जन्म दि. ३ मार्च १९३१ रोजी झाला.
पिढीजात शास्त्रीय गायनाचा वारसा लाभलेले गुलाम मुस्तफा खान हे अनेक घराण्यांचे गायन आत्मसात केलेले गायक होते. त्याखेरीज ते एक संशोधक आणि व्यासंगी अभ्यासक म्हणूनही ज्ञात होते. जाती गायन, प्रकारावर त्यांचा विशेष अभ्यास झाला होता. पॅरिस, जर्मनी सारख्या देशातील प्रतिष्ठेच्या संगीत समारोहातून त्यांनी सन्मानपूर्वक हजेरी लावली होती व त्यात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची प्रस्तुती करून परदेशवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. वारसा या दृष्टीने रामपूरसह स्वान घराण्यांचे गाणे त्यांच्याकडे आहे. सेनिया घराण्याचे हे मधल्या पिढीचे प्रतिनिधी होत. इनायत हुसेन यांचे नातू, ग्वाल्हेर घराण्याचा वारसा त्यांच्याकडून यांच्याकडे आला आहे. रामपूर घराण्याचे निस्सार हुसेन खान आणि त्यांचे वडील या दोघांकडून त्यांना या स्वान घराण्याची तालीम मिळाली आहे. संगीत नाटक अकादमीनेही त्यांना गौरविले आहे. घराणेदार तालीम मिळाल्यामुळे खास शैलीचा त्यांना लाभ झाला आहे. सोनू निगम हरिहरन, शान, आशा भोसले, गीता दत्त, मन्ना डे, ए.आर रहमान तसंच लता मंगेशकर देखील गुमाल मुस्तफा यांचे शिष्य होते. नुकतंच सोनू निगमने त्याच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या सारखं गाण्याचा व्हिडिओ शेअर केला होता. गुलाम मुस्तफा खान यांचे चिरंजीव मूर्तजा व कादर मुस्ताफ हे पण गायक आहेत. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण आणि पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गुलाम मुस्तफा खान यांचं निधन १७ जानेवारी २०२१ रोजी झाले. गुलाम मुस्तफा खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply