जेष्ठ चरित्र अभिनेता गोगा कपूर स्मृतिदिन. यांचा जन्म दि. १५ डिसेंबर १९४० रोजी झाला.
गोगा कपूर यांचे खरे नाव रविंद्र कपूर पण ते बॉलीवूड मध्ये गोगा कपूर या नावाने काम करत असत. अनेक चित्रपटात सपोर्टींग व्हिलनची भूमिका करणाऱ्या गोगा कपूर यांनी अभिनय क्षेत्रात रंगभूमीच्या माध्यमातून पदार्पण केले. उमेदवारीच्या काळात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या सोबतही रंगभूमीवर भूमिका साकारल्या. त्यांच्या रंगभूमीवरील अभिनायाची दखल घेऊन १९७१ साली ‘ज्वाला’ या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली. ५०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या गोगा कपूर यांच्या खलनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. ‘कयामत से कयामत तक’, ‘पत्थर के फूल’, ‘कभी हां कभी ना’, ‘तुफान’ ‘अग्निपथ’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या बरोबर २० हून अधिक चित्रपट केले. २००६ साली आलेल्या ‘दरवाजा बंद रखो’ हा त्यांची भूमिका असलेला अखेरचा चित्रपट होता. गोगा कपूर यांचे निधन ३ मार्च २०११ रोजी झाले.
https://www.youtube.com/watch?v=X63C3F4IeSE
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply