ज्येष्ठ तबलावादक, लेखक पंडित निखिल घोष यांचा जन्म २८ डिसेंबर १९१८ रोजी बारीसाल या पुर्व बंगालमधील गावी झाला.
निखिल घोष हे जेष्ठ बासरीवादक पन्नालाल घोष यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी आपले संगीताचे शिक्षण आपले वडील अक्षय कुमार घोष यांच्या कडे घेतले, जे सतार वाजवण्यासाठी प्रसिद्ध होते तसेच त्यांनी तबला वादनाचे शिक्षण व संगीताचे शिक्षण अहमद जान थिरकवा,अमीर हुसेन खान,ओंकारनाथ ठाकूर,बडे गुलाम अली खान, अमीर खान,पन्नालाल घोष, रवि शंकर अली अकबर खान,विलायत खान ,भीमसेन जोशी, निखिल बॅनर्जी, जसराज,अमजद अली खान, शिवकुमार शर्मा अशा महान संगीतकाराकडे घेतले होते.
निखिल घोष यांनी संगीत महाभारती या संस्थेची स्थापना १९५६ साली केली, यात त्यांनी अनेक होतकरू संगीतकाराना घडवले. याच संस्थेत अनिश प्रधान,एकनाथ पिंपळे,दत्ता यंदे इत्यादी पुढे नावारुपाला आले. त्यांनी आपले पुत्र नयन घोष व ध्रुबा घोष यांना अनुक्रमे तबला आणि सारंगी शिकवले. आपली मुलगी तुलीका घोष यांना पण या संस्थेत शिकवले. निखिल घोष यांनी अनेक मैफीली एडनबर्ग, ब्राटीसिवा, हेल्न्सकी, रोम, अथेन्स अशा विविध ठिकाणी केल्या.
त्यांनी Fundamentals of Rag and Tals with new system हे पुस्तक लिहून संगीतात क्रांती केली. त्यांना भारत सरकारने १९९० साली पद्मभुषण पुरस्कार देऊन गौरवले होते.१९९५ साली त्यांना उस्ताद हफीज अली खान पुरस्कार मिळाला. त्यांचा विवाह १९५५ साली उषा नयमपल्ली यांच्या बरोबर झाला होता.
पंडित निखिल घोष यांचे ३ मार्च १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply