नवीन लेखन...

रूपगंध बकुळ वृक्ष

हे झाड उत्तम सावली व सुंगधी फुले यामुळे ते लोकप्रिय आहे. दरवळ म्हंटल की, फुलांचा असं एक समीकरण आहे. फुलांचे अनेकविध प्रकार आणि मनात भरून टाकणारे त्यांचे सुवास. प्रत्येक फुलाचा वास वेगळा आणि रुबाब त्याहून वेगळा. सुगंधाची उधळण करणारी अशी कित्येक फुलं आहेत परंतु मूकपणा जवळ बाळगणारी अशी ही बकुळच.

बकुळ :

(बकुळी, बाबळी हिं. मुलसरी गु. बरसुळी, बोलसरी क. हल्मददू, गोळसर सं. अनंगका, शारदिका, बकुल इं. इंडियन मेडलर, बुलेटुड लॅ. मिम्युसॉप्स एलेगी कुल-सॅपोटेसी). फुलझाडांपैकी द्विदलिकित वर्गातील हा सु. १३ -१५ मी. (अंदमान बेटांत ३५ मी. ) उंच, सदापर्णी भारतीय वृक्ष बागांतून सामान्यपणे सुगंधी फुलांकरिता लावलेला आढळतो. श्रीलंका, मलाया, भारत (उ. कारवार, कोकण, द.भारत) इ. ठिकाणी सदापर्णी जंगलात वन्य अवस्थेत हा आढळतो. कोल्हापूर जवळ पन्हाळा येथे नगरपालिकेच्या बागेत ७० वर्षाचा एक बकुळीचा वृक्ष आहे. चिकू, मोह, ताराफळ, खिरणी इ. उपयुक्त वृक्षांचा समावेश असलेल्या सॅपोटेसी कुलात (मधूक कुलात) याचा अंतर्भाव केला आहे. याचे कारण या सर्वांत कित्येक लक्षणे समान व सॅपोटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत. ह्या वृक्षाचा माथा घुमटाप्रमाणे असून साल गर्द करडी व भेगाळ असते. पाने साधी, गर्द हिरवी, जाड, चिवट, लंबगोल, गुळगुळीत, एकाआड एक व टोकदार असतात. फुले लहान, १.५ सेंमी. व्यासाची, पिवळसर पांढरी, फार सुवासिक व तारकाकृती असून ती एकेकटी किंवा लहान झुबक्यांत जानेवारी ते मार्चमध्ये येतात. संद्रले ४+४ प्रदले १६+८, केसरदले ८, वंध्य केसरदले ८ व एकांतरित (एकाआड एक) किंजपट ६-८ कप्प्यांचा व ऊर्ध्वस्थ असतो. फूल मृदुफळ लंबगोल सु. २.५ सेंमी. लांब, टोकदार, पिवळे असून त्यात १-२ बिया असतात. बी तपकीरी, चकचकीत, अंडाकृती व काहीसे चपटे असते. या वृक्षाची नवीन लागवड बियापासून करतात. बी प्रथम टोपलीत रूजवून दोन वर्षानंतर रोपे पावसाळ्यात बाहेर लावतात. हे झाड फार सावकाश वाढते. उत्तम सावली व सुंगधी फुले यांमुळे ते लोकप्रिय आहे.

बकुळीची अभिवृद्धी बियांपासून, गुटी बांधून आणि पाचर-कलमानेही करता येते. कलमी रोपे हल्ली बऱ्याच नर्सरींमधून मिळतात. अशी कलमी रोपे एक वर्षांतच फुले देऊ लागतात; आणि ती कुंडीतही वाढवू शकतो. अर्थातच कुंडीतल्या झाडाला खूप फुले धरण्याची शक्यता नसते. बकुळ फुले सुकल्यानंतरही बरेच दिवस त्यांचा वास टिकून राहतो. या वृक्षाची खासियत म्हणजे त्याची नियमित छाटणी करून त्याला हवा तसा आकार देता येतो.

तापमान आणि आर्द्रता आवश्यकता:

बकुलची झाडे 20 ते 35 अंश सेल्सिअस (68 ते 95 अंश फॅरेनहाइट) तापमानासह उबदार हवामानात वाढतात. ते मध्यम ते उच्च आर्द्रता पातळी पसंत करतात, आदर्शतः 50 ते 70 टक्के दरम्यान. पुरेशी आर्द्रता निरोगी पर्णसंभार राखण्यास मदत करते आणि फुलांच्या उत्पादनास प्रोत्साहन देते. जोरदार वाऱ्यापासून संरक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे, कारण जास्त वारा झाडाला हानी पोहोचवू शकतो आणि त्याच्या वाढीस अडथळा आणू शकतो. योग्य तापमान आणि आर्द्रता प्रदान केल्याने बकुल झाडांचा इष्टतम विकास सुनिश्चित होईल

औषधी उपयोग:

बकुलमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत आणि ते विविध आजारांवर उपचार करण्याच्या प्रभावीतेसाठी ओळखले जाते. दातांच्या आणि पचनाच्या समस्यांसाठी हे विशेष फायदेशीर मानले जाते. त्याची पाने, फळे, साल आणि फुले औषधांमध्ये वापरली जातात.

1. सालाचा डेकोक्शन तयार केला जातो आणि तोंड धुण्यासाठी वापरला जातो.
2. दातदुखीसाठी साल पावडर लावली जाते. याच्या फांद्या दात स्वच्छ करण्यासाठी वापरतात.
3. कच्ची फळे दात मजबूत करण्यासाठी वापरतात.
4. वाळलेल्या फुलाची पावडर ब्रेन टॉनिक म्हणून खाल्ली जाते. हे डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी स्नफ (तपकीर) म्हणून देखील वापरले जाते.
5. फळांचा लगदा महिलांमध्ये प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी ओळखला जातो. शतकानुशतके गर्भवती मातांना बकुलची मात्रा दिली जात आहे कारण त्यात महिलांसाठी उत्तम रसायने आहेत. खरं तर, गर्भवती मातांना प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोजमाप डोस दिला जातो. हे बकुळ वृक्षाच्या वापरांपैकी एक आहे.
6. बकुल हे खूप चांगले लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध आहे. आयुर्वेदात, सालाचा अर्क रुग्णांना लघवीला चालना देण्यासाठी दिला जातो. (diuretic)
7. जुन्या काळात, साप, विंचू आणि कीटक यांच्या चाव्यावर उपचार करण्यासाठी बकुलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे.
8. पक्व् फळ खाद्य असून त्याचे मुरंबे किंवा लोणचे घालतात.
9. फुलांतील सुगंधी द्रव्य अत्तरे, तेल यांमध्ये वापरतात. फुले वाळवल्यावरही त्यांना बराच काळ सुगंध येतो.
10. खोडाच्या सालीत ३-७% टॅनीन असते. साल स्तंभक (आकुंचन करणारी), शक्तीवर्धक व ज्वरघ्न असते.
11. साल पाण्यात टाकून ते पाणी दंतरोगात चूळा भरण्यास चांगले असते.
12. फळ स्तंभक असून ते जुनाट आंमाशावर व अतिसारावर गुणकारी असते.
13. या झाडापासून डिंकही मिळतो.
14. कोवळ्या फांद्या दात स्वच्छ करण्यात वापरतात.
15. सुक्या फुलांची भुकटी तपकिरीप्रमाणे ओढल्यास डोकेदुखी व वेदना कमी होतात.
16. बकुळीपासुन सुगंधी साबण, अत्तर तयार करतात. बकुळीच्या सालीचा उपयोग आयुर्वेदात दातांच्या उपचारासाठी करतात.
17. अवांछित गर्भ पाडण्यासाठी फळांचा वापर होतो.
18. डोळ्याचं कमजोर पणा घालवण्यासाठी पानांचा रस वापरतात.
19. बकुळ दंतरोगावर उपयुक्त औषध, गुळण्या, हिरड्याच्या सुजेवर, कडकीवर, मूत्रविकारावर
वापरतात.
20. सालीचे चूर्ण वज्रदंती म्हणून वापरले जाते.
21. प्रसुती सहज होण्यासाठी पिकलेल्या फळांचा रस वापरतात.

रासायनिक माहिती:

साल – ३-५% टॅनिन, गोंड, सोपोलिन, व कांही क्षार
पुष्पे: सुगंधित तेल,
बीज: १०-१५% स्थिर तेल, जे स्वयंपाकाकरता व इंधन म्हणून वापरले जाते.

बकुळीच्या सालीचे गुण:

रस: कषाय,
गुण : गुरु,
वीर्य: शीत,
विपाक: कटू,
गुण : गुरु,
वीर्य: शीत,
विपाक: कटू,
प्रभाव: अस्थिवर स्रोताल,
दोष कर्म: पित्त, कफ,

इतर उपयोग:

1. हे साल कातडी कमाविण्यास व कापडाला पिंगट रंग देण्यास उपयुक्त आहे.
2. बियांत १६-२५% स्थिर तेल असून ते खाद्य व दिव्याकरिता उपयुक्त असते. लाकूड गर्द पिंगट, कठीण, टिकाऊ व जड असून रंधून व घासून ते गुळगुळीत व चकचकीत होते.
3. बांधकाम व सजावटी सामान, घाणे, होड्या, वल्ही, हत्यारांचे दांडे, कपाटे, वाद्ये, मसळे, कातीव काम, हातातल्या काठ्या इत्यादीकरिता ते वापरात आहेत.

संस्कृती आणि परंपरा:

हिंदू संस्कृतीत आदरणीय, बकुलचा संबंध प्रेमाच्या देवता, कामदेवाशी आहे. त्याची सुवासिक फुले शुद्धतेचे प्रतीक आहेत आणि धार्मिक समारंभ आणि विधींमध्ये वापरली जातात. मंदिरांजवळ आणि पारंपारिक लँडस्केपमध्ये झाडाची उपस्थिती दैवी सौंदर्य आणि अध्यात्म दर्शवते, अनेक समुदायांच्या सांस्कृतिक टेपेस्ट्रीमध्ये योगदान देते. वामन पुराणानुसार भगवान विष्णूच्या पूजेसाठी फुलांचा वापर केला जातो. बिया भगवान शंकराला अर्पण केल्या जातात.

1. पारिजातका प्रमाणेच, त्याची फुले जमिनीतून गोळा करून पूजेत अर्पण केली जाऊ शकतात.
2. बकुळची फुले सुकल्यानंतरही सुगंध टिकवून ठेवतात आणि हार घालण्यासाठी आणि उशामध्ये भरण्यासाठी वापरतात.
3. महाभारत, बृहत्संहिता, सुश्रुतसंहिता,कौटिलीय अर्थशास्त्र आणि संस्कृत साहित्यात (उदा., मेघदूत, रघुवंश, मालतीमाधव आणि गीतगोविंद) बकुळाचा उल्लेख आढळतो हा वृक्ष पूज्य व घराजवळ लावण्यास योग्य मानला आहे. व याचे औषधी गुणही पूर्वी वर्णिले आहेत.
4. भारतीयांसाठी, बकुल वृक्ष (Mimusops elengi) ला उच्च पौराणिक आणि धार्मिक महत्त्व आहे. अनेक प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आणि आयुर्वेदात उपचारात्मक वनस्पती म्हणून याचा उल्लेख आढळतो. त्याची फुले भारतात वसंत ऋतु किंवा “बसंत” च्या उदयाची चिन्हे आहेत असे म्हटले जाते. संपूर्ण झाडाला एक आनंददायी सुगंधी आभा आहे.
5. बकुळीच्या झाडाखाली कृष्ण बासरी वाजवून गौळणींना आकर्षीत करत असे असा महाभारतात बकुळीच्या झाडाचा उल्लेख आहे. म्हणजे ह्या बकुळीसोबर प्रेमभावनाही जुळलेल्या आहेत.

पर्यावरणीय प्रभाव:

बकुल वृक्ष पर्यावरणाच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्याची दाट पर्णसंभार विविध पक्ष्यांच्या प्रजातींसाठी सावली आणि निवासस्थान देते, जैवविविधतेला हातभार लावते, त्याची पाने चारा म्हणून वापरली जाऊ शकतात. विविध मातीच्या परिस्थितीत वाढण्याची आणि कीटकांचा प्रतिकार करण्याची झाडाची क्षमता ही वनीकरणाच्या प्रयत्नांची क्षमता असलेली एक कठोर प्रजाती बनवते. याव्यतिरिक्त, बकुलची कार्बन ग्रहण करण्याची क्षमता स्थानिक परिसंस्थेवरील हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी त्याला सहयोगी बनवते. बकुलची सुवासिक फुले फुलपाखरे आणि मधमाश्या आकर्षित करतात तर अनेक पक्षी त्याच्या खाद्य बेरीमुळे आकर्षित होतात.

बकुलवृक्ष: विषारीपणा

बकुळ वृक्ष मानवासाठी किंवा प्राण्यांसाठी विषारी मानला जात नाही. त्याची पाने, फुले आणि फळे सामान्यतः सुरक्षित आणि बिनविषारी असतात. तथापि, कोणत्याही वनस्पतीप्रमाणे, झाडाच्या कोणत्याही भागाचे मोठ्या प्रमाणात सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. काही व्यक्तींना विशिष्ट वनस्पतींबद्दल ऍलर्जी किंवा संवेदनशीलता असू शकते, म्हणून कोणतीही वनस्पती सामग्री हाताळताना किंवा वापरताना सावधगिरी बाळगणे नेहमीच चांगली कल्पना असते.

आयुर्वेदात याचे फार मोठे महत्त्व असले तरी त्याचा थेट वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

बकुळ वृक्ष पवित्र का आहे?

असंख्य हिंदू धर्मग्रंथांमध्ये आणि पौराणिक संदर्भांमध्ये त्याचा उल्लेख असल्यामुळे हिंदू धर्मात हे पवित्र मानले जाते. रामायणात, भगवान हनुमानाच्या नेतृत्वाखालील वानरसेनेने रावणाच्या विरोधात शस्त्र म्हणून वापरण्यासाठी बकुल वृक्ष उपटून टाकले.

मराठी साहित्यातील बकुळ:

अशा सुगंधित बकुळ फुलांचा मोह मराठी लेखकांना व कवींना पडला नसेल तर नवलच. बकुल हा लेखक आणि कवींचा लाडका.

कालिदासाच्या प्राचीन महान रचना “मेघदूत” पासून ते आधुनिक काळातील लेखिका सुधा मूर्ती त्यांच्या “जेंटली फॉल्स द बकुला” या पुस्तकात.
“या बाई या, बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया’. आम्हाला शाळेत असताना ही कविता होती. असंच दुसरंपण एक गाणं आठवतं “बकुळ फुला कधिची तुला ढुंढते वनात’. बकुळीची फुलं झाडावर पटकन् दिसत नाहीत. वास आल्यावर समजतं किंवा खाली पडलेली दिसतात. त्यावरून ही ओळ सुचली असावी. ही फुलं इतर फुलांसारखी कुजत नाहीत. वाळतात. वाळल्यावर सुद्धा आपला मंद सुवास कायम ठेवणाय्रा या फुलांना खरं तर अमर प्रीतीचं प्रतीक. तरुणपणी आपल्या प्रेयसीच्या वेणीत बकुळीचा गजरा माळण्याचा रोमँटिकपणा किंवा प्रियकराला ओन्जळ भरुन बकुळीची फुले देऊन आपले प्रेम व्यक्त करणारी प्रेयसी ही त्याची उदाहरणे आहेत.

बकुळीची फुले वाळली तरी कुजत नाहीत त्यामुळे पुर्वी वाळलेला बकुळीचा गजरा साडीच्या घडीमधे ठेवला जायचा. आतासारखे perfumes तेव्हा नव्हते. त्या साडीला व कपड्याना मंद असा वास येतो. लहानपणी वहीचे पान अलगद उलगडतांना बकुळीची फुले हाती लागतात आणि “शब्द, शब्द जपून ठेव, हे बकुळीच्या फुलांपरी” या गाण्याच्या ओळी सहज आठवतात.

बकुळीच्या नाजूकपणामुळे म्हणून की काय पूर्वी मुलींच्या नावातही हे फूल डोकावायचं. जुन्या मराठी लावणीपटांमध्ये एखादी सुंदर दिसणारी बकुळा हमखास असायची.”माझा कुणा म्हणू मी” या नावाच्या नाटकात एक कविता होती…”तुझी पाऊले बकुळफुले”. थोडक्यात काय तर नाटक-चित्रपटवालेही या बकुळीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहिले नाहीत. बकुळीचा वर्षाव अनुभवणे म्हणजे रसिकांना सुखद अनुभव असतो.

खालील दोन प्रसिद्ध कवितांनी लेखाचा शेवट करूया.

1. या बाई या
बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या
ऊन पडले पान फूल दिसे कसे गडगोडुले
गोडगोडुले मोतियाचे दाणे कुणी खाली पाडले
रान हालले पहाटेला शुकदेव गाणे बोलले.

2. छाया गर्द सुरेख गर हिरवी शोभे तुझी पालवी
सो सो गर्जत वाहुनी गदगदा वर तुला हालवी ।
भोती कुंपण दार , त्यावरूनही विस्तारल्या डाहळ्या
झाला भूमीवरी किती खच तरी ; पाने फुले पाकळ्या ।
पुष्पांचे झुबके किती लहडले प्रत्येक फांदीवरी
त्याच गंध चहूकडे पसरला, वर्णू किती माधुरी ।
पुष्पांच्या तव ओंजळीत तरुवरा डोक्यावरी ठेवतो
यावद्यजीव असो शिरावर तुझी छाया इचछीतो ।
ग.ल. ठोकळ

डॉ. दिलीप कुलकर्णी
मोबा. ९८८१२०४९०४
इ मेल : dkkul@yahoo.com
०२. ०६. २०२४

संदर्भ :

१. C.S.I.R. The Wealth of India Raw Materials Vol, VI, New Delhi, 1962.
२. काशीकर, चिं.ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास ,नागपूर, १९७४
३. विकिपीडिया.
४. सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 75 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

5 Comments on रूपगंध बकुळ वृक्ष

  1. अतीशय अभ्यासपूर्ण लेख…

    बकुळीचे फुल मला थेट बालपणात नेते कारण अगदी लहान असताना आमच्या शाळे समोरच एक बाकुळीच झाड होते आणि आजही तो सुगंध जून्या आठवणीत नेतो.

  2. छान माहितीपूर्ण लेख. माझे पण आवडते फुल आहे. झाडाला काटछाट करून हवा तसा आकार देता येतो हे प्रथमच कळले.
    धन्यवाद…

  3. लेख फारच सविस्तर आहे, ही माहिती शोधून काढणं हे सुद्धा फार परिश्रमाचे आहे.तुमचे हे काम अनमोल असून ज्ञानात भर टाकणारे आहे.
    असेच ज्ञानोपयोगी कामासाठी शुभेच्छा.म

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..