नवीन लेखन...

रशियाचे माजी पंतप्रधान व्हिक्टर चेनोमिर्दिन

व्हिक्टर चेनोमिर्दिन हे रशियामध्ये आणि रशियन भाषा बोलल्या जाणाऱ्या देशांमध्ये ओळखले जायचे ते त्यांच्या भाषेच्या बेधडक वापरामुळे! त्या भाषेचे व्याकरण, त्याची सुबोधता आणि त्याची शैली या सर्वांना ओलांडून ते बोलत राहायचे. बऱ्याचदा अनाकलनीय वाटणारे, कानावर सहसा न पडणारे असे शब्दप्रयोग ते वापरत, त्यामुळे ते आता काय बोलणार, असा प्रश्न पडे. तथापि ते लोकप्रिय बनले ते त्यांच्याकडे असणाऱ्या कनवाळू आणि मानवतावादी दृष्टिकोनामुळे! कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर ते रशियाचे पंतप्रधान बनले. बोरिस येल्त्सिन रशियाचे अध्यक्ष बनले आणि चेर्नोमिर्दिन त्यांच्यासमवेत काम करायला लागले. नियोजनबद्ध अर्थव्यवस्थेकडून खुल्या अर्थव्यवस्थेकडे रशियाला घेऊन जाण्याची किमया साधली म्हणून त्यांची आता इतिहासात नोंद होईल. ‘आम्हाला अधिक चांगले काही करायचे होते, पण ते नेहमीसारखेच झाले, ‘ असे ते नेहमी म्हणत. त्यामुळे त्यांनाही ‘नेहमीसारखेच’ ओळखले जात असे. व्हिक्टर चेर्नोमिर्दिन हे एका मजुराच्या घरात १९३८मध्ये जन्माला आले. त्यांना पाच भावंडे होती. त्यांनी आपले शालेय शिक्षण १९५७ मध्ये पूर्ण केले. ऑर्कमध्ये एका तेलाच्या शुद्धीकरण प्रकल्पामध्ये ते पाच वर्षे राबले. त्यानंतर त्यांनी क्युबिशेव्ह इन्स्टिट्यूटमध्ये नाव दाखल केले.

प्रवेश परीक्षेत त्यांना अतिशय बेताचे गुण मिळाले. गणिताच्या चाचणीत तर ते अनुत्तीर्ण झाले. त्यांची परीक्षा इंडस्ट्रियल पुन्हा घेण्यात आली. त्यात त्यांना ‘सी ग्रेड’ मिळाली. १९७२ मध्ये ‘ त्यांनी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून पत्रव्यवहाराद्वारे आपला अभ्यासक्रम पुरा केला. १९६७ ते १९७३ या दरम्यान त्यांनी ऑर्कमध्ये असतानाच रशियन कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यात लक्ष घालायला सुरुवात केली. ओरेनबर्गमध्ये त्यांना नैसर्गिक वायूच्या शुद्धीकरण प्रकल्पामध्ये संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. १९७८ ते १९८२ या काळात अवजड उद्योगात त्यांना नियुक्त करण्यात आले.

१९८२ मध्ये सोव्हिएत युनियनच्या मंत्रिमंडळामध्ये ते नैसर्गिक वायू खात्याचे उपमंत्री तर १९८५ ते १९८९ या काळात ते कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली या उद्योगाचे सरकारीकरण करण्यात संचालकपदावर आले. १९९१च्या उत्तरार्धात सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले तेव्हा ‘गॅझप्रॉम’ या सरकारी कंपनीच्या असणाऱ्या चेर्नोमिर्दिन यांना नव्या रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी पंतप्रधानपदी नियुक्त केले.

१९९० च्या दशकामध्ये ‘गॅझप्रॉम’ ही कंपनी सोव्हिएत युनियनच्या चेर्नोमिर्दिन अर्थकारणाचा कणा मानली जात होती. तथापि याच दशकामध्ये ही कंपनी अपेक्षेला उतरू शकली नाही. मात्र ती २००० मध्ये सर्वाधिक नैसर्गिक वायूचे उत्खनन करणारी कंपनी बनली. १९९५ च्या एप्रिलमध्ये त्यांनी आपला एक स्वतंत्र गट ‘अवर होम-रशिया’ या नावाने सुरू केला. त्यानंतर लगेचच म्हणजे जूनमध्ये शामिल बसायेव्ह या दहशतवाद्याने बुदियोनोव्हस्की येथे पंधराशे जणांना ओलीस ठेवले तेव्हा त्याच्याबरोबरची बोलणी यांनीच केली.

चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतरच्या समझोत्यापायी रशियन सरकारने चेचेन्यामध्ये हाती घेतलेली लष्करी कारवाई थोपवावी लागली. बोरिस येल्त्सिन यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हा ते २३ तासांसाठी रशियाच्या अध्यक्षपदीही होते. १९९८ मध्ये वानक बडतर्फ केले जाईपर्यंत ते पंतप्रधानपदी होते. त्याच वर्षी रशिया भयानक आर्थिक संकटात सापडला तेव्हा चेर्नोमिर्दिन यांना येल्त्सिन यांनी पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्त केले. त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणूनही त्यांनी घोषित केले, पण ‘ड्यूमा’ने त्यांची ही निवड दोनदा फेटाळून लावली.

तिसऱ्यांदा ती फेटाळली गेली असती तर ‘ड्यूमा’लाच विसर्जित करावे लागले असते. तो धोका न पत्करता येल्त्सिन यांनी येव्हगेनी प्रिमाकोव्ह यांना पंतप्रधानपदावर नियुक्त केले. जून २००१ मध्ये व्लादिमिर पुतिन जेव्हा रशियाचे अध्यक्ष झाले तेव्हा चेर्नोमिर्दिन यांना युक्रेनमध्ये रशियाच्या राजदूतपदी नियुक्त करण्यात आले होते. युक्रेनबरोबर रशियाचा वाद इरेला पेटला तेव्हा चेर्नोमिर्दिन यांनी युक्रेनबरोबर चर्चाच होऊ शकणार नाही असे जाहीर केले. त्या वेळी युक्रेनने चेर्नोमिर्दिन यांना ‘अनावश्यक व्यक्तिमत्त्व’ असे जाहीर करायची तयारी चालवली होती. अखेरीस चेर्नोमिर्दिन यांना माघार घेणे भाग पडले. ११ जून २००९ रोजी चेर्नोमिर्दिन यांना रशियन अध्यक्ष दमित्री मेदवेदेव यांनी अध्यक्षांचे खास सल्लागार म्हणून नियुक्त केले होते.

चेर्नोमिर्दिन यांचे ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..