न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी ही भारतातील सर्वांत जुनी व मोठी विमा कंपनी आहे. सर दोराबजी टाटा यांनी २३ जुलै १९१९ रोजी या कंपनीची स्थापना केली.
१९७२ साली विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर ही कंपनी भारत सरकारच्या स्वामित्वाखाली आली. आज न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी ही बहुराष्ट्रीय कंपनी झाली असून तिचा विस्तार २७ देशांत पसरला आहे. वाहन विमा, स्वास्थ्य विमा, मेडिक्लेम, पर्सनल अॅ क्सिडेंट, गृह कर्ज विमा, यंत्रसामग्री विमा, पीक विमा, शेती उपकरणांचा विमा, माल वाहतूक विमा अशा अनेक विमा योजना कंपनीकडे आहेत. २०१८ १९ वर्षी कंपनीने २०००० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply