जनजाती, वनवासी समाजासाठी पेसा वनाधिकार कायदा 1996, 2006-2008 मध्ये जरी लागू झाला असता तरी खरा वनाधिकाराचा अधिकार 25 सप्टेंबर 1930 मध्येच आम्हाला प्राप्त करून देणारा वीर बलिदानी युवक नाग्या कातकरी अमर रहे..
कातकरी समाजामध्ये नाग्या दादा म्हणून प्रसिद्ध पावलेला हा युवक ज्या कातकरी समाजाचा होता ती चार पाच लाख संख्येची जमात स्वातंत्र्याच्या अमृत काळात ही आदिम जनजातीमध्ये मोडली जाते.. याहून दुर्दैव ते काय?
जंगल आमच्या हक्काचे, जंगल आमच्या मालकीचे आणि इंग्रजांचा त्याच्यावर कोणताही अधिकार नाही हे वर्तमान पनवेल जिल्ह्यातील चिरनेर येथे अक्कादेवीच्या टेकडीवर झालेल्या 1930 च्या जंगल सत्याग्रहाच्या संघर्षात केवळ 19 वर्षाच्या नाग्या कातकरीने आपल्या शरीरावर गोळी झेलून सिद्ध केले.
जिथंपर्यंत आपला झेंडा हे ब्रिटिश, गोरे काढू शकत नाहीत तीथपर्यंत जंगलावर आपल राज्य राहील म्हणून टेकडीच्या माथ्यावर सर्वात उंच झाडावर झेंडा रोवणारा निधड्या छातीचा नाग्या पोलिसांच्या गोळीला बळी पडला तोच ह्या ऐतिहासिक सत्याग्रहाचा हिरो होता.
आपल्या अधिकारासाठी स्वतः जागृत होऊन आपल्या समाजाला बरोबरीने आपल्या लहान भावाला हुतात्मा होण्यास प्रेरणा देणाऱ्या नाग्याची मोठी बहीण ठकीला ही मानाचा मुजरा. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या देशभरातील जनजाती वीरांची जनगाथा शोधून त्यावर त्या त्या स्थानी कार्यक्रमाच्या निमित्ताने मानवंदन देण्याचा प्रयत्न अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रममा तर्फे देशभरात सुरू आहे. चिरनेर येथील या सत्याग्रहाच्या अभिवादनासाठी 25 सप्टेंबरला कार्यक्रम केला जातो गेली 25 वर्षे निरंतरपणे हा अभिवादनाचा कार्यक्रम सुरू आहे….
चिरनेर, पनवेल येथील वनवासी कल्याण आश्रमामार्फत या सत्याग्रहाचे प्रतीक म्हणून नाग्या दादाचा पुतळा गावात मध्यभागी उभारलेला आहे.
Leave a Reply