भेट अशी की ती
जणू भेट झालीच नाही;
तू आलीस खरी पण
तू भासलीच नाही…!
होतीस समोर जरी तू
मनात तुझ्या वादळ वेगळे;
सोबत होतो आपण पण
मिलाप भासलाच नाही…!
जबाबदाऱ्यांचं ओझं म्हणू
की दुनियादारी च दडपण;
एकत्र होतो आपण पण
विरघळनं भासलच नाही…!
द्विधा मनस्थिती म्हणू की
घालमेल मनाची तुझ्या;
हात हातात तरी पण
साथ भासलीच नाही…!
नसेल तुला खात्री तरीही
सदैव तुझाच मी;
नसता कधी सोबत तरी पण
वेगळे असे भासलोच नाही….!
पण आज…..
तू आलीस खरी पण
तू भासलीच नाही…!
विशाल झावरे पाटिल
०९/१०/२०२३
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक
Leave a Reply