झांझीबार आहेही तसेच, अगदी मस्त! पण अशा पर्यटन स्थळांच्या व्यवस्थापनाच्या वास्तवतेतले प्रचंड मोठे आव्हान ध्यानात येत आहे. झांझीबार पर्यटन विकास क्षेत्रात सर्वच ‘आलबेल’ नव्हते. एक खटकणारी गोष्ट म्हणजे विकास कार्यात स्थानिक छोट्या मोठ्या व्यापार्यांना शिरकाव प्राप्त झाला नाही. किनारपट्टीवरच्या विकासकार्यात घुसलेल्या एक-दोन बलाढ्य कंपन्यांची मुसंडी इतकी जबरदस्त होती की स्थानिक ठेकेदरांना स्पर्धेत शिरताच येणे शक्य नव्हते. तशी झांझीबारची आकडेवारी जबरदस्त आहे.
पण मधुचंद्रासाठी झांझीबारला कधीमधी गेलात तर व्यवस्थापन-समस्यात कशाला घुसायचं? दर्यातल्या दूरच्या पर्यटन-गृहात मस्तपैकी चंदेरी मिठीत आणि गुलाबी स्वप्नात मशगुल असावे! ‘चांदका डोला हो और बिजलीका बाजा हो.. डोलीमे रानी हो और घोडेपे राजा हो.. प्यारके रस्ते हो और फूल बरसते हो
.. बनना चाहती थी एक दिन तारोंकी रानी’
– अरुण मोकाशी
परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील लेखाचा हा अंश.
हा संपूर्ण लेख तसेच त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/
किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-
Leave a Reply