नवीन लेखन...

आत्महत्या ते नक्षलवाद!





एक भुकेलेला मुलगा काहीतरी खायला दे असे म्हणत आईकडे जातो. खरेतर कोणत्याही मातेसाठी लेकराच्या भुकेपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नसते. ते नसायलाही नको असे समाज समजतो. पण, ही माता थोडी वेगळी होती. तिने खायला मागणाऱ्या मुलाला जेवण देण्याऐवजी एक कानफाडात लगावून दिली. मग आईच्या या माराची तक्रार करायला तो मुलगा वडिलांकडे धावला. आपल्याला भूक लागली म्हणून जेवण मागितले तर आईने मारल्याची तक्रार त्याने जन्मदात्याकडे केली. पण, वडिलांनीही त्याला जेवण देण्याऐवजी किंवा बायकोला रागावण्याऐवजी मुलाच्या दुसऱ्या कानशिलाखाली सणसणीत चपराक ठेवून दिली. जेवण मागितले म्हणून आईवडील असे का मारताहेत, हे न उमजल्याने तो मुलगा दोघांचीही तक्रार करायला आणि अर्थातच भूक लागली म्हणून जेवण मागायला आजीकडे गेला. तिनेही जेवण तर दिलेच नाही, उलट पेकाटात एक लाथ हाणली. अखेरीस असाच प्रसाद त्या भुकेलेल्या हताश मुलाला आजोबांकडूनही मिळाला. तिने त्याचा कान पिरगाळला आणि पाठीत दणके घातले. घरातील सगळेच असे जेवणाऐवजी मारत सुटल्याने अखेर त्या मुलाचा संयम सुटला. तो भूक-तहान विसरला आणि घरातील सगळ्या काचेच्या वस्तू त्याने रागारागात फोडून टाकल्या. लगेच घरातील सगळ्यांनी एक बैठक घेतली आणि त्या पात्य मुलाला विद्रोही ठरवून टाकले. हे वाचल्यानंतर निश्चितपणे तुम्हा सगळ्यांचे मत हेच झाले असणार की, त्या भुकेलेल्या मुलाला घरात जी काही अर्धी-चतकोर असेल ती दिली असती, किमान आता लगेच तुला जेवण देऊ शकत नाही असे त्याला समजावले असते तरी त्याने ते समजून घेतले असते. तो भडकला नसता. पण, कुटुंबातील लोकांनी त्याला समजून घेतले नाही, त्याची तक्रार ऐकली नाही. जो उठला तो त्याला मारायला लागला. परिणामी मुलाचा संयम सुटला. हे जरी रुपक असले तरी या अशा मानवी स्वभावांमधील हटवादीपणाचे दर्शन कमीअधिक प्रमाणात दर्

न घडविणाऱ्या घटना नेहमीच आपल्या आजूबाजूला

घडत असतात. समस्यांमुळे त्रस्त असलेल्या लोकांच्या जखमांवर मलम लावण्याऐवजी मीठ चोळले जाते. सामान्य लोकांवरील अन्यायाचे परिमार्जन करावे अशी ज्यांच्याकडून अपेक्षा असते ते तसे करीत नाहीतच, उलट दडपशाही करतात. नवा अन्याय सामान्यांवर लादतात. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ अशी जरी जगाची रीत समजली जात असली तरी ज्या-ज्या वेळी हातात लाठी असणारा तिचे प्रहार करीत जातो त्या-त्या वेळी एका नव्या विद्रोहाची ठिणगी टाकली जात असते. ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्या सत्तेचा वापर स्वत:च्या हितरक्षणासाठी करतात आणि लोकांना वाऱ्यावर सोडले जाते. सामान्यांच्या समस्यांची दखल घेतली जात नाही. त्यांच्यावर दंडुके बरसले जातात. मग अन्यायठास्तांच्या मनात चीड जन्म घेते. सगळ्याच अन्यायठास्तांमध्ये अन्यायाचा सामना करण्याइतकी हिंमत नसते. जे कमकुवत, दुबळे असतात ते मुकाट, निमूटपणे खाली मान घालून अन्याय-अत्त्याचार सहन करतात, गुलामीचे जिणे जगतात. मात्र ज्यांच्या मनगटात जोर असतो, अत्त्याचार करणाऱ्यापुढे ताठ मानेने उभे राहण्याइतका ज्यांचा कणा ताठ असतो, ज्यांची मने जिवंत असतात ते पेटून उठतात, हातात लाठ्या-काठ्या घेतात आणि हिंमतीने अन्यायाचा प्रतिकार करतात. बहुतेकवेळा आपण त्यांना विद्रोही ठरवून टाकतो. तसे ठरवून टाकताना ते असे का बनले याचा सारासार विचार कधीच केला जात नाही. अलिकडे या विद्रोहाला नक्षलवाद म्हटले जाते. 1960 ते 70 दरम्यान असेच घडले होते आणि त्यातूनच हा नक्षलवाद हा शब्द समोर आला. पश्चिम बंगालच्या उत्तर भागातील नक्षलबारी हे शेतकरी आंदोलनाचे मोठे केंद्र होते. तेथे जमीनदारांनी शेतकऱ्यांवर चालविलेल्या अत्त्याचाराविरुध्द आंदोलन उभारण्याऱ्या शेतकऱ्यांची बाजू राज्यकर्त्यांनी घेतली नाही. उलट जमीनदारांच्या हितासाठी आंदोलक श
तकऱ्यांचे दमन चालविले, त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्या अत्त्याचाराचा सामना करण्यासाठी चारु मजुमदार, कानू सन्याल हे नेते समोर आले. अत्त्याचार करणाऱ्यांचे गळे कापण्याचे आंदोलन त्यांनी राबविले. ते आंदोलन चांगले 1972 पर्यंत चालले. दरम्यान चारु मजुमदारचा पोलीस कोठडीतील छळादरम्यान मृत्यू झाला आणि सध्या ज्या नक्षलवादाने, त्यातील हिंसाचाराने भयंकर रुप धारण केले आहे त्याचा जन्म झाला. नक्षलबारीमधून जन्म झाला म्हणून तो नक्षलवाद!
नापिकी, बेभरवशाचा बाजार, बँका व सावकारांच्या कर्जाचे पाश, त्यामुळे प्रचंड गरिबी आणि तिच्या निर्मूलनाचा उपाय हाती नसल्यामुळे शेवटी आत्महत्त्या अशा महाभयंकर दुष्टचक्राचा सामना करणाऱ्या विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था सध्या वर उल्लेख केलेल्या भुकेलेल्या मुलासारखी आहे. आई जेऊ घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही, ही म्हण इतक्या वेळा चघळली गेली आहे की, तिचा पार चोथा झाला आहे. गलितगात्र शेतकऱ्यांचा कोणीही वाली नाही. आम्ही तुमच्याच हिताची काळजी करीत आहोत असे दाखवित ज्यांच्या-ज्यांच्या हातात शेतकऱ्यांच्या भल्याची सूत्रे आहेत ते सगळेजण एकमेकांशी संगनमत करुन त्याला लुटत आहेत. राजकीय पक्षांना मतांची गरज आहे आणि त्यासाठी ते समाजातील शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योजक या घटकांची काळजी घेण्याऐवजी पैशाच्या बळावर मते विकत घेऊ शकणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींच्या आहारी गेले आहेत. अगदीच स्पष्ट सांगायचे तर लाचार बनले आहेत. गेले दशकभर राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा विकृतीकरण याबाबत सर्व स्तरावर चर्चा सुरु आहे; पण ते थांबविण्यासाठी ज्यांनी सर्वात समोर यायला पाहिजे ते राजकीय पक्ष मात्र शांत आहेत. अवैध मार्गाने, दारु विकून किंवा वरलीचे अड्डे चालवून ज्यांनी बक्कळ पैसा कमावला आहे त्यांनी राजकीय नेत्यांना मदत करणे
णि बदल्यात आपले धंदे निर्धोक बनवून घेणे हे आता इतिहासजमा झाले आहे. कितीही पैसा कमावला तरी समाजात प्रतिष्ठा मिळत नाही, हे लक्षात घेऊन हे समाजकंटक थेट राजकारणातच उतरले आणि आता तर त्यांनी हे क्षेत्रच काबीज केले असल्याचे चिंताजनक चित्र निर्माण झाले आहे. हाच आजच्या राजकारणाचा ‘पॅटर्न’ बनला आहे. अशावेळी

सामान्य लोकांनी कायदा हातात घेतला, आपले कोणीच वाली नाही या भावनेला

‘आपले आपणच वाली’ असे उत्तर त्यांनी शोधले तर त्यांना दोष तो काय देणार? असाच काहीसा प्रकार सध्या बुलडाणा व अकोला जिल्ह्यात सुरु आहे. खामगाव व नजीकच्या भागातील सावकारठास्त शेतकरी सध्या सावकाराने दडपशाहीच्या बळावर हडपलेल्या जमिनी लोकशत्त*ीच्या बळावर ताब्यात घेण्यासाठी एकमेकांना आधार देत बाहेर पडत आहेत. सावकाराच्या प्रचंड दहशतीचा तसेच त्याची बटीक बनलेल्या शासकीय यंत्रणेचा सामना करीत काहीजणांनी आपल्या जमिनी पुन्हा ताब्यात घेतल्या आहेत. राजाश्रय लाभलेल्या अवैध सावकाराची पाठराखण जर सरकारी यंत्रणाच करीत असेल, सावकारठास्त शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल शेतकरी आत्महत्त्यांचे सत्र थांबवायला(?) निघालेले राज्य सरकार घेत नसेल, दाखल झालेल्या प्रत्येक तक्रारीची पृष्ठभूमी लक्षात न घेता तिची वासलात लावली जात असेल तर न्याय मिळविण्यासाठी लोक हातात लाठ्या-काठ्या घेऊन बाहेर पडणार नाहीत तर काय करतील? अशावेळी त्या सामान्य अन्यायठास्तांना आपण विद्रोही ठरविणार आहोत काय? सावकार, सरकारी यंत्रणा किंवा व्यवस्थेने निर्माण केलेल्या परिस्थितीत मुकाटपणे अन्याय सहन करणे आणि तो ज्या दिवशी असह्य होईल त्यादिवशी आत्महत्त्या करणे किंवा हातात दंडुके घेऊन अन्यायाचा प्रतिकार करणे हे दोनच पर्याय ज्यांच्यासमोर शिल्लक आहेत त्यांनी पहिलाच पर्याय निवडावा अशी आपण अपेक्षा धरणार आहोत काय?

r>

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..