नवीन लेखन...

कॅलरीज रिसट्रीकशन फायद्याचे की नुकसानीचे?

जगात सगळीकडे बदलाचे वारे वाहताना दिसतात. खेडोपाडी वागण्या बोलण्यात अगदी खाण्या पिण्यातही शहरीकरणाचा प्रभाव होताना दिसत आहे. सध्या लोकांचा जास्त एनर्जी असलेले पदार्थ, तळकट पदार्थ, साखर आणि साखरेचे पदार्थ, मीठ/मीठाचे पदार्थ खाण्याकडे कल वाढलेला दिसतो तसेच फळ व भाज्या खाण्याकडे दुर्लक्ष होताना दिसतय. ह्या सर्वांनाचा परिणाम म्हणून आहारातून तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी होताना दिसतोय. ह्या सर्व जीवन पद्धतीचा एकत्रित परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसतोय. मधुमेह, ह्रदय रोग, हाइपरटेंशन, काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर, आणि ह्या मुख्यत्वे करून लठ्ठपणा वाढवताना दिसतोय. ह्या सर्वांवर मात करण्यासाठी बहुतेकदा कमी कॅलरीज घेण्याचा सल्ला दिला जातो. कुपोषण (malnutrition) न होता केलेले कमी कॅलरीजचे सेवन दिर्घायुष्य लाभण्यास आणि आरोग्य तारुण्यातच राखण्यात मदत करताना दिसतात, पण आयुष्य किती काळ वाढवू शकेल ह्याचा मात्र निश्चित अंदाज बांधता येत नाही.

कॅलरी रिसट्रीकशन ही अशी खाण्याची पद्धत आहे कि ज्यात आहारातील कॅलरीजचे सेवन कमी केले जाते. कॅलरीज किती कमी करायच्या हे मात्र त्या व्यक्तीच्या पूर्वीच्या कॅलरीजच्या सेवनावर किंवा त्या व्यक्ती सारख्या इतर व्यक्तीच्या सरासरी कॅलरीजच्या सेवनावर अवलंबून असते.

Calorie Restriction with Optimal Nutrition (CRON) हा आहार कॅलरीज मध्ये कमी असूनही इतर अन्नघटकांनी समृद्ध असतो. नुसत्या कॅलरीज रिसट्रीकशन आहारापेक्षा CRON आहार घेणाऱ्या व्यक्तींमध्ये आरोग्य दिर्घकाळ सुस्थितीत राखण्यात मदत करताना दिसतात. ह्यामुळेच अशी व्यक्ती आपले आयुष्य दिर्घकाळ सुंदररित्या जागताना दिसतात.

CRON आहाराचे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम
– लठ्ठपणा टाळण्यास व वजन कमी करण्यासाठी मदत
– मधुमेह, हाइपरटेंशन, कॅन्सर टाळण्यास/आटोक्यात आणण्यासाठी मदत
– ह्रदयरोग व रक्तवाहिन्यावरील ताठरपणा कमी करण्यास तसेच ह्रदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडतात. ह्रदय व इतर रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणे, ह्या गोष्टीं ह्रदयरोगाशी निगडित आहेत आणि ह्या अपायकारक गोष्टींवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने CRON आहार महत्वाचे ठरतात.

CRP, triglycerides, Low Density Lipoprotein (LDL), high density lipoprotein (HDL) आणि रिकाम्या पोटीची रक्तातील साखरेवर नियंत्रण सुधारल्याने इतर रोगांचा धोका कमी करण्यात मदत.

– कॅन्सरचा धोका निर्माण करण्याशी निगडीत असलेले विविध मेटाबॉलिक घटक आणि हार्मोन्स कमी करण्यात यश त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत
– शरीरातील आणि मुख्यत्वे करून पोटात आढळणाऱ्या चरबी मध्ये घट
Circulating insulin, testosterone, estradiol and inflammatory cytokines ह्या सारखे घटक जे कॅन्सरशी निगडित आहेत त्यामध्ये घट
Insulin like growth factor I आणि IGFBP -3 मध्ये घट परंतु जर प्रथिनांचे सेवन गरजेपेक्षा (dietary reference intake) जास्त केल्यास मात्र हा फायदा मिळताना दिसत नाही.

colories-2कमी कॅलरीजचे सेवन अयोग्य पद्धतीने केल्यास होणारे दुष्परिणाम
– कुपोषणास निमंत्रण
– रक्तक्षय, पायाच्या तळव्यावर सूज येणे, चक्कर येणे, चिडचिड होणे, सुस्ती येणे, डिप्रेशन मध्ये जाणे ह्या सारख्या परिणामांना तोंड द्यावे लागते
– माणसांवरील काही छोट्या प्रयोगात असे आढळले आहे कि मसल मास, स्ट्रेंथ (ताकद) कमी होणे, bone mineral density कमी होणे; middle aged आणि वृद्ध व्यक्तींमधे मृत्युच्या प्रमाणात वाढ होताना दिसते
– कोल्ड सेन्सिटिव्हीटी चा धोका वाढतो
– आठवड्याला 1/2 ते 1 किलो पेक्षा जास्त वजन घटवल्यास पित्ताशयात खडे निर्माण होणे, किंवा रक्तातील इलेकट्रोलाईट मधील संतुलन बिघडणे ह्या सारखे धोके वाढतात
– 21 वर्षाखालील मुलामुलींनी, लहान मुलांनी खूप कमी कॅलरीजचे सेवन करून वजन घटवू नये कारण त्यांची शारीरिक वाढ खुंटते, मानसिक वाढीवर ही त्याचा परिणाम होताना दिसतो. किशोर वयातील मुलांच्या मेंदूत भौतिक (physical) बदल घडून येऊ शकतात.
Underweight मातांमध्ये दिवस भरण्यासाठी अगोदरच प्रसूती होणे, बाळाचे वजन कमी असणे ह्या सारखे धोके वाढतात म्हणूनच गरोदरपणात स्त्रियांनी अतिशय कमी कॅलरीज असलेला आहार घेणे टाळा.
– एखादी स्त्री गरोदर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर आशा स्त्रीने सुद्धा असा कमी कॅलरीजचा आहार घेऊ नये कारण बीएम्आय आवश्यकतेपेक्षा कमी असल्यास इनफरटीलिटीचा (वंध्यत्व) धोका वाढतो, मासिकपाळी वेळच्या वेळी न येणे, तसेच हार्मोन्समधे बदल होणे ह्या सारखे धोके वाढतात.
– जसे गरोदर स्त्रियांना त्रास होतो तसाच त्रास स्तनपान करणार्या स्त्रीला ही होतो. जो पर्यंत स्त्री स्तनपान करत असेल तो पर्यंत त्या स्त्रीने कमी कॅलरीजचा आहार घेऊ नये, तर स्तनपान बंद केल्यावरच कमी कॅलरीजचा आहार घेऊ नये. आयुष्याच्या सुरवातीलाच म्हणजे बाळाच्या जन्मापासूनच त्याला मिळणारा आहार हेल्दी असावा. बाळाच्या योग्य वाढीसाठी, cognitive development सुधारण्यासाठी आईचा आहार हेल्दी असावा. कारण पहिले काही महिने बाळाला सर्व अन्नघटक आईच्या दूधातूनच मिळत असतात. तसेच स्तनपानाचा दिर्घकाळ होणारा फायदा म्हणजे त्या बाळाच्या पुढील आयुष्यात लठ्ठपणा किंवा स्थूलता न वाढणे, आणि Non Communicable Disease (NCD) चा धोका ही कमी होतो.

आयुष्यभर हेल्दी आहार घेतल्यास वेगवेगळ्या प्रकारचे कुपोषण तर थांबवतेच आणि त्या बरोबर मधुमेह, ह्रदयरोग, स्ट्रोक आणि कॅन्सर सारख्या NCD रोगांपासूनही बचाव करण्यासाठी मदत करतात.

colories-3हे फायदे मिळवण्यासाठी काही उपयुक्त टीप्स

– जेवढ्या कॅलरीज खाल तेवढ्या खर्च केल्यास वजन नियंत्रणात राहते
– वजन वाढू न देण्यासाठी एकूण कॅलरीजच्या 30% पेक्षा कमी कॅलरीज फॅटस (स्निग्ध पदार्थ) मधून घ्याव्यात.
– साखर शक्यतो कमी प्रमाणातच घ्या. एकूण कॅलरीजच्या 10% पेक्षा कमी कॅलरीज साखरेतून घ्याव्यात. आरोग्य आणखीन सुधारण्यासाठी फक्त एकूण 5% कॅलरीज साखरेतून घेतल्यास उत्तम.
– प्रौढ व्यक्तिंनी 5 ग्रॅम पेक्षा जास्त मीठाचे सेवन करू नये. मीठाचे सेवन कमी झाल्यास हाइपरटेंशन टाळण्यास किंवा ते उशीरा होण्यास उपयुक्त ठरू शकते. त्याचा दुसरा फायदा म्हणजे ह्रदयरोग आणि स्ट्रोक चा धोका ही कमी होऊ शकतो.

ह्या सर्व फायद्यांसाठी कमी कॅलरीजचे सेवन करावयाचे असल्यास CRON (Calories Restriction with Optimal Nutrition) आहाराचे सेवन करा.

Avatar
About डॉ. शीतल म्हामुणकर 20 Articles
डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..