जय जय अंबे, जय जय अंबे, जय जय जगदंबे
महामाये आदिशत्ते* काली रूपे जगदंबे ।। धृ।।
रूद्र स्वरूपे सौम्यहि रूपे ब्रम्ह रूपिणी आदिशत्ते*।
ब्रह्या विष्णु शंकर तुजसि स्तवती कैलासावर ते ।।
घे अवतारा तार जगाला मार शुंभ नि शुंभाला ।
करी पार्वती संहाराचे रूपही धारण त्या काला ।।1।।
जय जय अंबे ।।धृ।।
रूद्र रूप ते प्रचंड भासे कंठी शीरांचे हार ।
लवलव लवलव जिभही करीते कटी बांधिले करहार ।।
भु भु:त्कारे कंपे धरणी कंप सुटे गगनावर ।
वर्ण निळा हा काळा भासे नेत्री विलसे भास्कर ।।2।।
जय जय अंबे ।।धृ।।
उग्र रूप रूद्र स्वरूप त्वरीतही तारी भत्त*ांते ।
असंख्य रूपे धारण केली तारण करण्या भत्त*ांते ।।
कोधी येता काली म्हणसी शांत स्वरूपी विझाई ।
भत्त*ा दासा गणेश सुता मुत्त* करी त्वरीत ही आई ।।3।।
जय जय अंबे ।।धृ।।
गायक – श्री.गजानन प्रधान.
Leave a Reply