चष्मा लावूनी करीत होतां,
ज्ञानेश्वरीतील पारायण,
दृष्टीमधले दोष काढले,
चाळशीचा आधार घेवून ।।१।।
फुटूनी गेला एके दिवशीं,
चष्मा त्याच्या हातामधूनी,
पारायणे ती बंद पडली,
दृष्टीस त्याच्या बाध येऊनी ।।२।।
चालत असता सरळपणे,
दैनंदिनीचे कार्यक्रम,
खीळ पाडूनी बंद पाडी,
क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम ।।३।।
वस्तूचे मूल्य ठरते,
तिच्या उपयोगिते वरती,
तोलण्यास धन न लागे,
मूल्य मापन जेंव्हां होती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply