देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर साखरफुटाणे, पेढे, खोबरे, फळे आदी पदार्थ भाविकांना वाटले जातात. त्याला देवाचा प्रसाद अशी संज्ञा आहे.
प्र म्हणजे पुढे, साद म्हणजे हाक मारणे. प्रसाद ग्रहणामागे देवाला `आमचे जीवन पुढे ने’ अशी सुप्तपणे मारलेली हाक असते. या प्रसादामध्ये देवाची कृपादृष्टी असल्यामुळे तो श्रध्देने खाल्ला असता समाधान प्राप्त होते.
देवाला पंचामृताचे स्नान घातल्यानंतर ताम्हणात जे पंचामृताचे पाणी सांडते त्याला तीर्थ म्हणतात. कारण त्याला तीर्थक्षेत्राचे महत्व प्राप्त झालेले असते. हे तीर्थ प्राशन केले असता तीर्थक्षेत्राचे पुण्य माणसाला लाभते. तीर्थ याचा अर्थ असा की जे तारते ते तीर्थ. म्हणूनच देवाची आरती झाल्यावर तीर्थप्रसाद देण्याचा प्रघात पूर्वापार चालत आला आहे.
Leave a Reply