प्रभूंने बँक काढली उघडा खाते,
ठेवा पूंजी आपली आणा सुख जीवनाते ।।१।।
जेवढे गुंतवाल मिळेल व्याजा सहित,
दरा विषयीं तो आहे अगणित ।।२।।
ही बँकच न्यारी तुम्हां न दिसेल कोठे,
धुंडाळूं नका संसारी होईल दुःख मोठे ।।३।।
पाप पुण्याची ठेव जमा करिते बँक,
जसा असेल भाव तशी देईल सुख दुःख ।।४।।
गरज पडतां धन मिळणे हे आपल्याच हातीं,
परि कामीं येणें पुण्य हें प्रभूचे इच्छांती ।।५।।
जमता पुण्याच्या राशी चांगली कर्मे करुनी,
नाते जडतां ईश्वरासी जाल तुम्हीं उद्धरुनी ।।६।।
— डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply