अनेक कायस्थ कुटुंबात अतिशय भक्तीभावानी गायली जाणारी हि श्री म्हाळसाकांताची आरती आपल्या सर्वांच्या माहितीसाठी …. !!!!
पिवळे निशाण तुमचे पिवळे शिखर ..पिवळे शिखर !
पिवळा कांचन पर्वत , पिवळा कांचन पर्वत …पिवळे नगर
पिवळी तुमची काया पिवळा शृंगार ….पिवळा शृंगार !
पिवळे राजे तुम्ही …पिवळे राजे तुम्ही राणी सुकुमार !
जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा
विशाल शंकर ढवळा… विशाल शंकर ढवळा ,त्याहुनी तू पिवळा //१//
पिवळी बाणा बाई धनगरीण बाळ, धनगरीण बाळ
पिवळ्या घोड्यावरी बससी मैराळ !
चारी वाद्ये वाजती देवांच्या सकळा देवांच्या सकळा
दासी झाल्या मुरळ्या ..दासी झाल्या मुरळ्या
भोगिसी त्या सकळा !
जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा ….
विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा , त्याहुनी तू पिवळा //२//
चंपाषष्ठी चा कुळधर्म केला …कुळधर्म केला
पिवळ्या पुरणाची ..पिवळ्या पुरणाची आरती देवाला
रोग्याने सेवा केली त्यावरी सकळा …त्यावरी सकळा ,
त्यावरी कृपा केली… त्यावरी कृपा केली …पिवळ्या मैराळा
जयदेव जयदेव ..जयशिव मैराळा ,जयशिव मैराळा
विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा …त्याहुनी तू पिवळा //४//
सदानंदाचा येळकोट !!!
येळकोट येळकोट …जय मल्हार !!!
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply